येत्या वर्षभरात एसटीच्या स्लीपर बस येणार

टीम महाराष्ट्र देशा : एसटी महामंडळ प्रवाशांच्या सुखसोयीसाठी प्रयत्यशील दिसत असून एका पाठोपाठ एक आरामदायी वातानुकुलीत बसची सेवा ग्राहकांच्या सेवेत उपलब्ध होत आहे. शिवनेरी, अश्वमेध त्यानंतर काही दिवसांपूर्वी सुरु झालेली शिवशाही बस आणि आता शयनयान ही बस सेवा लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार असून लाल परीत दिवसेंदिवस बदल होताना दिसतो आहे.

येत्या वर्षभरात साधारण एक हजार बस प्रवाशांच्या सेवेत दाखल होतील. सध्या पुण्यातील मध्यवर्ती कार्यशाळेत विनावातानुकूलीत असलेल्या शयनयान असलेल्या बसच्या निर्मितीच काम सुरु आहे. टू बाय वन, 30 शयन कोच असणारी ही बस पुण्यातील सीआयआरटी या संस्थेकडे प्रमाणित करून त्यानुसार बांधणी सुरु आहे.

या विनावातानुकुलीत शयनयान बससेवेसाठी एसटीचे चालक आणि वाहकचं सेवा देणार असल्याची माहिती एसटीच्या सूत्रांनी दिली. रातराणी बसेससाठी असणारी भाडेआकारणी जेवढी आहे तेवढीच राहील अथवा थोडीफार वाढ यात केली जाईल मात्र अद्याप यात अजून अंतिम निर्णय झालेला नाही. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या प्रयत्नातून सुरु झालेली शिवशाही बस सेवेनंतर आता लवकरच शयनयान विनावातानुकूलीत बससेवा दाखल होईल.

PHOTO : पुणे-नाशिक महामार्गावरील भीषण अपघातात ९ जणांचा मृत्यू

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळ्यात तुरुंगात असलेल्या रमेश कदमांची लोकसभेसाठी तयारी !

You might also like
Comments
Loading...