महापौर पदासाठी रस्सीखेच ; गिरीश महाजन नगरमध्ये दाखल

टीम महाराष्ट्र देशा- अहमदनगरमध्ये आज महापौर आणि उपमहापौरपदासाठी निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन नगरमध्ये दाखल झाले आहेत. संख्याबळ नसतानाही भाजपकडून सत्तास्थापनेसाठी हालचाली सुरू आहेत.

नगरमध्ये राजकीय वर्तुळातील अनिश्चिततेचे वातावरण कायम आहे. स्वबळावर महापौर करण्याची तयारी भाजपाने पूर्ण केली आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही.

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसनेही मागील निवडणुकीवेळचा अनुभव लक्षात घेऊन भाजपला साथ देण्याबाबत अधिकृतपणे भूमिका जाहीर केलेली नाही. त्यामुळे अखेरच्या क्षणी शिवसेना व भाजपाची युती होणार की, राष्ट्रवादी काँग्रेसची साथ घेऊन भाजप स्वतःचा महापौर करणार? याकडे नगरकरांचे लक्ष लागले आहे.