मुख्यमंत्र्यांच्या शहरात पत्रकाराच्या आई व मुलीची हत्या

ravikant kamabale mother1

नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शहरात कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. नागपूर टुडेचे पत्रकार रविकांत कांबळे यांच्या आईची मुलीची हत्या झाल्याची धक्कादायक घटना नागपुरात घडली आहे. त्यामुळे पत्रकारांना नव्हेच तर पत्रकारांच्या कुटुंबालाही गुन्हेगार टार्गेट करत असल्यामुळे पुन्हा एकदा पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Loading...

रविकांत कांबळे असे पत्रकाराचे नाव आहे. ते पवननगर दिघोरी नाका उमरेड रोड येथे राहतात. नागपुरातील एका वेब न्यूज पोर्टलमध्ये ते क्राईम रिपोर्टर म्हणून ते कार्यरत आहेत. उषा सेवकदास कांबळे (५४) असे मृत आईचे तर राशी रविकांत कांबळे असे मृत चिमुकलीचे नाव आहे. शनिवारी सायंकाळी ५.३० वाजता रविकांत यांची आई व मुलीचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर मध्यरात्री गळा आवळून हत्या करण्यात आली. तसेच दोघांचेही मृतदेह पोत्यात भरून ते उमरेड रोडवरील विहीरगाव येथील नाल्यात फेकले. रविवारी सकाळी १०.३० वाजता एका व्यक्तिला पोत्यात मृतदेह आढळून आला. त्यानंतर या मृतदेहांची ओळख पटवल्यानंतर हे दोन्ही मृतदेह उषा कांबळे आणि राशी कांबळे यांचेच असल्याचे स्पष्ट झाले.

उषा सेवकदास कांबळे यांच्या अंगावरचे दागिने गायब झाले आहेत. तसेच त्यांच्याजवळचे पैसेही लंपास करण्यात आले आहेत. लुटीच्या उद्देशाने अपहरण करून या दोन हत्या करण्यात आल्या असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. याप्रकरणी पोलीस आता अधिक तपास करत आहेत.

पत्रकार रविकांत कांबळे यांनी त्यांची आई व मुलगी मिसिंग असल्याची फेसबुकवर पोस्ट केली होती 

nagapur crime1Loading…


Loading…

Loading...