प्रीती झिंटा विनयभंग प्रकरणी वाडियांविरोधात आरोपपत्र दाखल

मुंबई : पंजाब आणि चेन्नई सुपर किंग्ज या संघांदरम्यान आयपीएल सामना सुरु असताना वाडिया यांनी विनयभंग केला आणि शिवीगाळ तसेच आपल्यावर हल्ला केल्याची तक्रार बॉलीवूड अभिनेत्री प्रीती झिंटाने ४ वर्षांपूर्वी उद्योजक मित्र नेस वाडिया यांच्या विरोधात दाखल केली होती. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी २०० पानी आरोपपत्र मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट इस्प्लानेड कोर्टात दाखल केलं आहे.

३० मे २०१४ रोजी किंग्ज इलेव्हन पंजाब आणि चेन्नई सुपर किंग्ज या संघांदरम्यान आयपीएल सामना सुरु असताना प्रीती झिंटाला वानखेडे मैदानाच्या गरवारे पॅव्हेलियनमध्ये बसलेलं पाहून वाडियांनी तिकीट वाटपावरुन आपल्या टीमच्या कर्मचाऱ्यांना सर्वांसमोर शिवीगाळ केली. त्यानंतर प्रीतीने आपली जागा बदलली. पण त्याने वाडियांचं समाधान झालं नाही, त्यांनी सगळ्या टीम सदस्यांच्यासमोर आपल्याला शिवीगाळ आणि असभ्य वर्तन केलं, शिवाय आपले हात जोरात खेचत आपल्यावर वाडियांनी हल्ला केला, असा आरोप प्रीतीने केला आहे. दरम्यान, मुंबई पोलिसांनी २०० पानी आरोपपत्र कोर्टात दाखल केलं आहे.

कलम ५०६ गुन्हेगारी स्वरुपाचा त्रास देणं, आयपीसी कलम ३५४ म्हणजे हल्ला करणं, कलम ५०९ विनयभंग करणं या कलमांअतर्गत आरोप ठेवण्यात आले आहेत. आरोपपत्र दाखल करण्यात आलं त्यावेळी नेस वाडिया कोर्टात हजर होते. त्यांना २० हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सोडण्यात आलं. वाडियांनी मात्र हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत.

You might also like
Comments
Loading...