नवी दिल्ली: कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम (P. Chidambaram) यांची ११ वर्षे जुन्या एका आरोपाप्रकरणी झडती घेण्यात आली आहे. यावरून काँग्रेसने तीव्र विरोध दर्शवला असून पी. चिदंबरम यांच्या राष्ट्रनिष्ठेवर कुणीही अविश्वास दर्शवू शकत नाही, असे काँग्रेसचे रणदीप सुरजेवाला यांनी म्हटले आहे.
दरम्यान ११ वर्षांपूर्वी एक वीज कंपनीसाठी २६३ चिनी नागरिकांना व्हिसा प्राप्त करून दिला असल्याचा आरोप पी. चिदंबरम आणि कीर्ती चिदंबरम यांच्यावर करण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री असताना त्यांच्यावर हा आरोप ठेवण्यात आला आहे. या प्रकरणीच सीबीआयने मंगळवारी पी. चिदंबरम आणि कीर्ती चिदंबरम यांच्या घरांवर आणि कार्यालयांवर छापे टाकत झडती केली आहे.
This morning, a CBI team searched my residence at Chennai and my official residence at Delhi. The team showed me a FIR in which I am not named as an accused.
The search team found nothing and seized nothing.
I may point out that the timing of the search is interesting.
— P. Chidambaram (@PChidambaram_IN) May 17, 2022
तर पी. चिदंबरम यांनी यासंदर्भात ट्वीट करत म्हटले आहे की, “आज सकाळी सीबीआयच्या पथकाने माझ्या चेन्नई येथील निवासस्थानाची आणि दिल्लीतील माझ्या अधिकृत निवासस्थानाची झडती घेतली. टीमने मला एक एफआयआर दाखवला ज्यामध्ये माझे नाव आरोपी म्हणून नाही. शोध पथकाला काहीही सापडले नाही आणि काहीही जप्त केले नाही. मी निदर्शनास आणू शकतो की शोधाची वेळ मनोरंजक आहे.”
महत्वाच्या बातम्या:
- “कोणी कितीही आकडे मोड करावी मात्र…”, संजय राऊतांचा इशारा
- IPL 2022 MI vs SRH : हैदराबाद झिंदाबाद..! चित्तथरारक लढतीत मुंबईचा पराभव; टिम डेव्हिडची स्फोटक खेळी व्यर्थ!
- IPL 2022 MI vs SRH : हैदराबादचं मुंबईला १९४ धावांचं आव्हान; त्रिपाठी, गर्गची सुंदर खेळी!
- “राजमुद्रेची विटंबना थांबवा,” ; संभाजी ब्रिगेडचं मनसेला आवाहन
- “महिला कुडमुडी ज्योतिषी…”; चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळेंवर टीका