अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना काहीच नाही, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक

टीम महाराष्ट्र देशा : मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात आज कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी शेतकरी आत्महत्येच्या प्रश्नावरून मोदी सरकारला लक्ष केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच वर्षांपूर्वी शेतकऱ्यांना काही आश्वासने दिली होती. मात्र ती पूर्ण झाली नाहीत. त्यामुळे मोदींनी दिलेला शब्द पाळावा, असे म्हणत राहुल गांधी यांनी लोकसभेत आक्रमक भाषण केले.

Loading...

यावेळी राहुल गांधी म्हणाले की, केरळमध्ये गेल्या दीड वर्षांमध्ये 18 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. गेल्या 5 वर्षात केंद्र सरकारने 5.5 लाख कोटी रूपयांचे मोठ्या व्यावसायिकांचे कर्ज माफ केले. मात्र दुसरीकडे देशातील शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कोणतीही पावले उचलण्यात आलेली नाहीत. त्यामुळे मोदींनी शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळावा, असे राहुल गांधी म्हणाले.

दरम्यान वायनाडमधील एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. तसेच वायनाडमधील 8 हजार शेतकऱ्यांना कर्जाची रक्कम न भरल्याचे सांगत बँकेने नोटीस पाठवली. तसेच अनेकांच्या जमिनी जप्त करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये वाढ झाल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.Loading…


Loading…

Loading...