मुंबई : जून महिना चालू झाला तरी पाऊस बरसला नव्हता त्यामुळे शेतकरी बांधव पावसाची आतुरतेने वाट पाहत होते. यावेळी पाऊसाचे आगमन लवकर होईल असा हवामान खात्याचा अंदाज होता. पण तरीही पावसाने यंदा तीन दिवस उशिरा हजेरी लावली. उशिरा का होईना पण पावसाला सुरवात झाली.
राज्यातील विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, आणि जळगाव जिल्ह्यामध्ये पावसाचे आगमन झाले आहे. वादळी पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. मंचरच्या रविवारच्या आठवडी बाजाराच्या दिवशी अचानक मुसळधार पाऊस बरसल्याने भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचा विक्रीला आलेल्या भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत दिसत आहे.
गेल्या तीन दिवसांपासून पुणे जिल्ह्यातील आंबेगावमध्ये पावसाचे आगमन झाले आहे. पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे बांध फुटले. विक्रीसाठी आलेल्या भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतीमालापेक्षा शेतकऱ्यांना भाजीपाल्यामधून चांगले आर्थिक सहाय्य मिळते. पण यावेळी त्याचे देखील नुकसान झाले आहे. पाऊस पडल्याचा आनंद असला तरी भाजीपाल्याच्या नुकसानीमुळे शेतकरीराजा नाराज झाला आहे.
महत्वाच्या बातम्या :