तर शिवसेनाही स्वबळावर लढायला तयार; सर्व ११५ जागा लढवणार

टीम महाराष्ट्र देशा : आगामी औरंगाबाद महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडी करून एकत्र लढावे अशी आमची इच्छा आहे. पण कॉंग्रेसने स्वबळावर सर्व जागा लढण्याची तयारी केली असले तर शिवसेनाही स्वबळासाठी सज्ज असल्याचे आमदार आणि शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी सांगितले आहे.

औरंगाबादच्या आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेनेसोबत आघाडीत न जाता स्वबळावर लढण्याची मागणी स्थानिक कॉंग्रेस नेते व पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली असल्याची महिती आहे. तसेच मुंबईत आज झालेल्या बैठकीत थोरात यांनी कॉंग्रेस सर्व  ११५ जांगावर लढण्याची तयारी करा, असे आदेश पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.

Loading...

या पार्श्वभूमीवर अंबादास दानवे यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली. दानवे म्हणाले, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले आहे. त्यानंतर राज्यात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत अनेक ठिकाणी महाविकास आघाडी एकत्रितपणे लढली . महापालिका निवडणुकीत देखील कॉंग्रेसने आमच्या सोबत यावे अशी आमची इच्छा आहे.

परंतु कॉंग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केली असून तशी मागणी देखील त्यांनी वरिष्ठ नेत्यांकडे केल्याची माहिती आहे. कॉंग्रेस सोबत आली तर आनंदच आहे, आणि आम्ही त्यांचे स्वागतच करू. परंतु याचा अर्थ शिवसेना स्वबळावर लढू शकत नाही असा नाही.

तसेच शिवसेनेची देखील ११५ वॉर्डांमध्ये उमेदवार करण्याची तयारी आहे. अगदी मुस्लिमबहुल भागात देखील आमच्याकडे उमेदवार आहेत असा दावा दानवे यांनी केला आहे. शेवटी स्वबळावर लढायचे? की एकत्रित याचा निर्णय तीन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते घेतील, असे दानवे म्हणाले.

Loading...
Loading...




Loading…




Top Posts

अजय देवगणजी खूप कमवल आता तान्हाजी मालुसरेंच्या वंशजांना आर्थिक मदत करा - मनसे
हे सरकार पडले तर 'आम्हाला' दोष देऊ नका...
आम्ही रात्रीच्या वेळी झोपूही शकत नाही ; आम्हाला येथे अजिबात सुरक्षित वाटत नाही
व्याह्याला वाचवण्यासाठी संजय काकडेंची धडपड
'अजित पवारांना पुन्हा आमच्याबरोबर यायचं दिसतंय'
...त्यामुळे पहिल्यांदाच मला सभागृहात बसावं असं वाटल - उद्धव ठाकरे
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
कीर्तने पोलीस बंदोबस्तात करावी लागतात हीच तर माझी दहशत - तृप्ती देसाई
'स्व. बाळासाहेब होते का स्वतंत्र लढ्यात', निलेश राणेंचा शिवसेनेवर पलटवार
छगन भुजबळांच्या विरोधात गेला तो 'संपला' ! वाचा काय आहे प्रकरण