fbpx

साखळी बॉम्ब स्फोटांनी हादरलेल्या श्रीलंकेतील कोलंबोमध्ये आणखी एक बॉम्बस्फोट

टीम महाराष्ट्र देशा – श्रीलंकेत बॉम्बस्फोटाचं सत्र थांबण्याचं चित्र अद्यापही दिसत नाही. कारण अवघ्या काही मिनिटांपूर्वी श्रीलंकेची राजधानी कोलंबोमधील एका चर्चजवळ पुन्हा एक मोठा बॉम्बस्फोट झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिलं आहे.

आठ साखळी बॉम्ब स्फोटांनी हादरलेल्या श्रीलंकेतील कोलंबो शहरात आज आणखी एक बॉम्बस्फोट झाला. एका चर्च शेजारील बॉम्ब निकामी करताना हा बॉम्बस्फोट झाला. सुदैवांने यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर येत आहे. याशिवाय शोधमोहिमेत पोलिसांना एका बस स्टॉपवर ८७ बॉम्ब डेटोनेटरही मिळाले आहेत.

या संपूर्ण घटनेनंतर श्रीलंकेच्या राष्ट्रपती मैत्रिपाला सिरिसेना यांना देशात आणीबाणी जाहीर केली आहे. राष्ट्रपती सिरिसेना यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची बैठक पार पडली, त्या बैठकीत आणीबाणी जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला. श्रीलंकेत मंगळवारी शोक दिवस जाहीर करण्यात आला आहे.