सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक प्रचारासाठी आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बोलताना एक भाकित वर्तवले होते. निकालादिवशी अगदी पुन्हा तसेच घडले. अजित पवारांनी वर्तवलेले हे भाकीत आता खरे ठरल्याचे दिसून आले आहे.
‘दक्ष राहा, साताऱ्यात समान मते मिळाल्याने चिठ्ठीद्वारे निकाल द्यावा लागला, तर एका मताने दोन उमेदवारांचा पराभव झाला आहे,’ असे महाविकास आघाडीच्या नेत्यांना बजावून सांगितले होते.
जिल्हा बँक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. या निकालामध्ये महाविकास आघाडी पॅनेल प्रमुख सतीश सावंत (Satish Sawant) यांना टायनंतर पराभव स्वीकारावा लागला, तर भाजपच्या (BJP) गुरुनाथ पेडणेकर व प्रकाश गवस यांना केवळ एका मताने पराभव स्वीकारावा लागला आहे.
भाजपच्या वतीने केंद्रीय मंत्री नारायण राणे, रविंद्र चव्हाण, नितेश राणे, प्रसाद लाड, नीलेश राणे, जिल्हाध्यक्ष राजन तेली तर महाविकास आघाडीच्या वतीने अजित पवार, उदय सामंत, सतेज पाटील, विनायक राऊत, दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, पॅनेल प्रमुख सतीश सावंत तसेच शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तसेच जिल्ह्यातील या तिन्ही पक्षाची यंत्रणा काम करीत होती, त्यामुळे ही निवडणूक लक्षवेधी ठरली होती.
भाजप नेते आपण सत्ता पुन्हा खेचून आणणार, असे आधीच सांगत होते. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे नेते सत्ता राखणारच असे सांगत होते. मात्र, यात भाजपचे म्हणणे खरे ठरले आणि महाविकास आघाडीला 8 संचालकांवरच समाधान मानावे लागले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- नारायण राणेंनी काढली अजित पवारांची अक्कल; म्हणाले…
- महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांना कोरोनाची लागण
- ज्याला हात नाही ते एकहाती सत्ता घेतात; नारायण राणेंचा विरोधकांना टोला
- राजन तेलींच्या पराभवावर नारायण राणेंची प्रतिक्रिया; म्हणाले…
- अर्थमंत्री येतात, पराभव करुन जातात, त्याला अक्कल म्हणतात; नारायण राणेंचा टोला
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<