युतीच्या विजयी २२० जागांमध्ये संगमनेरचीही जागा असणार, राधाकृष्ण विखेंना विश्वास

blank

टीम महाराष्ट्र देशा : देश आता प्रगतीपथावर असून राज्य देखील प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहे. याची प्रचीती आपल्याला लोकसभा निवडणुकीत आलीचं आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत देखील याचं प्रगतीच्या जोरावर २२० जागांचे उद्दिष्ट भाजप सरकार साध्य करणार आहे. आणि त्या जागांमध्ये संगमनेरच्या जागेचा देखील समावेश असणार आहे, असे म्हणत राज्याचे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे यांनी संगमनेरची जागा युतीचं जिंकणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.

संगमनेर व्यापारी असोसिएशनच्या वतीने विखे यांच्या उपस्थितीत संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राधाकृष्ण विखे पाटील बोलत होते. मोदी सरकारने व्यापारी आणि आर्थिक क्षेत्रात बदलेल्या धोरणांमुळे व्यापारी आणि उद्योजकांना फटका बसला आहे. नोटाबंदी, GST , रेरा यामुळे बांधकाम क्षेत्र देखील ढेपाळले आहे. बाजारात सर्वच क्षेत्रात मोठी मंदी आली आहे. यासंदर्भात व्यापारी आणि उद्योजकांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी संवाद साधला.

यावेळी विखे म्हणाले की, संगमनेरच्या बाजारपेठेने मोठी परंपरा राखली, या तालुक्याच्या विकासात मोलाचे योगदान दिले आहे. GSTच्या अंमलबजावणीनंतर व्यापारी आणि उद्योजकांनी उपस्थित केलेल्या शंका आणि कराच्या आकारणीतील त्रृटी दूर करण्यासाठी केलेल्या सूचनांचा स्वीकार सरकारने केला. सामान्य माणसासाठी असलेल्या जीवनावश्यक वस्तूंवरील कर कमी करून दिला. तसेच नोटाबंदीनंतर बाजार पेठेवर झालेल्या परिणामावर भाष्य करताना विखे म्हणाले की, अनेकांनी रिअल इस्टेटमध्ये केलेल्या गुंतवणुकीचा हा परिणाम आहे. बांधकाम व्ययवसायाशी २६ घटक जोडले गेलेले आहेत. त्यामुळे बाजारात मंदी आहे. याबाबत आपली केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली असून या व्यवसायाला कसा दिलासा देता येईल, असा प्रयत्न आपण निश्चित करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या