सचिनच्या शेवटच्या सामन्यात वेस्टइंडीजचा ‘हा’खेळाडू ढसाढसा रडला होता…

मुंबई : क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. लहानांपासून ते मोठमोठ्या खेळाडूंपर्यंत अनेक जण त्याच्या खेळाचे चाहते आहेत. सचिनशी प्रत्येकाचं एक भावनिक नात आहे. अशाच वेस्टइंडीजच्या दोन क्रिकेटपटूंनी नुकताच एक खुलासा केला आहे, त्यातून त्यांनी सचिनच्या खेळाचे चाहते असल्याचं एका खास पद्धतीने व्यक्त केलं आहे.

कोरोनावर औषध आलं, गोळीची किंमत आहे १०३ रुपये

किर्क एडवर्ड्स आणि ख्रिस गेल हे ते दोन क्रिकेटपटू आहेत. 2013मध्ये सचिनने मुंबईतील वानखेडे स्टेडिअममध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध आपला शेवटचा सामना खेळला होता. त्यानंतर त्याने क्रिकेटला अलविदा केलं होतं. या सामन्यानंतर सचिनने एक हृदयस्पर्शी भाषण दिलं होतं. किर्क एडवर्ड्सने एका लाईव्ह चॅटदरम्यान त्या दिवशीच्या त्या भावपूर्ण क्षणांविषयी खुलासा केला आहे.

पती सीमेवर करत आहे देशसेवा, पत्नी झाली तहसीलदार

किर्क म्हणाला की, तो माझाही 200वा कसोटी सामना होता. त्यामुळे ते क्षण माझ्यासाठीही भावपूर्ण होते. जेव्हा सचिनने त्याचं निरोपाचं भाषण केलं, तेव्हा मी आणि ख्रिस आम्ही बाजूबाजूलाच उभे होतो. आम्ही दोघंही रडत होतो. आम्ही खूप प्रयत्नांनिशी आमचं रडू रोखून धरत होतो आणि स्वतःला रडू नकोस, असंही समजवत होतो. पण, तो क्षण खरंच खूप नाजूक होता. या माणसाला आपण पुन्हा कधीच क्रिकेटच्या मैदानावर पाहू शकणार नाही, याची जाणीव करून देणारा होता, असं किर्क यावेळी म्हणाला. तो पुढे म्हणाला की, सचिन तेंडुलकर माझ्यासाठी खूप खास व्यक्ती आहे. सचिनच्या शेवटच्या सामन्यात मी खेळलो नव्हतो. माझ्या कारकिर्दीच्या एका टप्प्यावर सचिनने माझ्या वाईट काळात खूप मदत केली आहे, असंही किर्क यावेळी म्हणाला.