आला पावसाळा, आरोग्य सांभाळा

टीम महाराष्ट्र देशा : पावसाळा या ऋतूची सगळेचं वाट बघत असतात. सगळीकडे अगदी प्रसन्न वातावरण असते.पाने-फुले बहरली असता. सगळ्यांना अगदी हवाहवासा वाटणारा, अनेक कवीनींं यावर केलेल्या कविता तर मनाला भारावून टाकतात. पण या पावसाचे जेवढे फायदे आहेत तेवढे तोटे देखील आहेत. त्यामुळे या ऋतूत सजग असणे महत्त्वाचे असून आपल्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असते.

याकाळात अनेक रोग डोकं वर काढत असतात. संसर्गजन्य ताप, सर्दी-खोकला इ. व्हायरल फिवर अर्थात संसर्गजन्य ताप हा ऐकायला सोपा वाटत असला तरी त्याने एकदा का आपल्या शरीरात ठाण मांडले की त्याला मात देणे खूप त्रासदायक असते.

स्त्रियांमधील लठ्ठपणा म्हणजे नेमके काय ?

पावसाळ्यात घ्यावयाची काळजी :-

  • केस व कपडे ओले असताना वातानुकूलित जागेमध्ये जाण्याचे टाळावे. त्यामुळे व्हायरल फिव्हर, सर्दी, खोकला असे आजार होण्याची शक्यसता असते.
  • पावसातून बाहेरून घरात आल्यावर आधी पाय स्वच्छ कोरडे करावेत. तसेच ओले मोजे वापरू नयेत.
  • अंघोळीच्या पाण्यात कडूलिंबाची पाने टाकल्यास त्वचेला होणारा जंतुसंसर्ग काही प्रमाणात टाळता येतो.
  • अन्नपचन नीट व्हावे, यासाठी या काळात भरपूर पाणी पिणे योग्य ठरते.
  • नेहमीच्या चहाऐवजी जर औषधी चहा, Green Tea घेतला तर आरोग्याच्या दृष्टीने फायद्याचे ठरते. कॉफीमुळे डीहायड्रेशन होत असल्यामुळे कॉफी घेणे टाळावे.
  • पिण्याचे पाणी स्वच्छ भांड्यात झाकून ठेवावे. घरात पाणी साठविण्याचे हौद, टाक्या, माठ, हंडे, पिंप, बादल्या इ,. भांड्यांच्या अस्वच्छतेमुळे पाणी दूषित होते. ते स्वच्छ ठेवा.
  • उघड्यावरील पदार्थ खाऊ नये. घरातील अन्नपदार्थ झाकलेले असावेत. हात स्वच्छ धुतल्याशिवायकोणातही पदार्थ खाऊ नये. नासलेले किंवा शिळे अन्न खाऊ नये.
  • स्वच्छता म्हणजे निर्मळता, निर्जंतुकता, प्रसन्नता, टापटीपता, निटकेपणा हे लक्षात ठेवा आणि ते अंमलात आणा.
  • सर्व आजारांचे मुळ तुमच्या आहार विहार आणि विचारात असते. त्यात नियमितता असल्यास व योग्य व्यायाम असल्यास आजार आपल्यापासून दुर पळतात. इतर ऋतुंच्या तुलनेत पावसाळ्याचा विचार केल्यास मोठ्या प्रमाणात आजाराचा फैलाव होत असतो. या कालावधीत प्रत्येकाने स्वतःची काळजी स्वतःघेतल्यास परिसराची स्वच्छता राखल्यास आजार होणार नाही आणि झाल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार करावेत.

Food hunter : सुरळीच्या वड्या

पोटातील चरबी कमी करण्यासाठी ५ घरगुती उपाय