पुण्यात पहिल्या पावसातचं रस्ते खचले, मनसेने केले हटके आंदोलन

टीम महाराष्ट्र देशा : पावसाला अजून सुरवात देखील झाली नाही तोच पुण्यातील रस्ते खचंत असल्याचा प्रकार आढळून आला आहे. तर पुण्याच्या स्थानिक प्रशासनाचा भोंगळ कारभार देखील उघडकीस आला आहे. दोन दिवसापूर्वी केलेला रस्ता पहिल्या रिमझिम पावसात खचतोचं कसा असा सवाल निर्माण होऊ लागला आहे. त्यामुळे निर्ढावलेल्या प्रशासनाला जाग यावी यासाठी मनसेच्या धडाकेबाज कार्यकर्त्यांनी आपल्या मनसे स्टाईलमध्ये आंदोलन केले आहे. बिबवेवाडी येथील रस्त्याच्या मध्ये डांबर खचून पडलेल्या खड्यात बसून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने आंदोलन करण्यात आले आहे.

बिबवेवाडी येथे गेल्या चार महिन्यापासून ड्रेनेजचे काम सुरु होते. अखेर हे रंगाळलेले काम चार दिवसापूर्वी पालिकेने पूर्ण केले. काम पूर्ण होताच पालिकेने त्यावर रस्ता बनवला. मात्र हा रस्ता पहिल्या रिमझिम पावसातचं खचला. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. तसेच वयोवृद्ध पादचार्यांना या खड्याचा अडथळा निर्माण होत आहे.त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी आक्रमक होत प्रशासनाच्या भोंगळ कारभारा विरोधात आंदोलन केले आहे.

Loading...

यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी खचलेल्या खड्यात बसून आंदोलन केले. तर कामाचा सर्वोत्कृष्ट खड्डा असे लिहीलेला फ्लेक्स देखील या ठिकाणी लावला. तसेच खचलेल्या डांबराला हार देखील घालण्यात आला.

 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का
अरे तुम्ही काय संरक्षण काढता, पवारांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्रातील पैलवान सरसावले
आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
जातीवाद रोखण्यासाठी शरद पवार मैदानात; सरकार उचलणार 'हे' पाऊल
'उद्धव ठाकरे अनुभवशून्य मुख्यमंत्री; महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे'
करोना आजार होऊ नये याकरिता दक्षता घेण्याबाबत पुणे मनपाचे आवाहन
राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांची गुंडगिरी, 'इंडियन ऑईल'च्या अधिकाऱ्यांना केली हाणामारी
राष्ट्रवादीची गुंडगिरी : भाजपने केला सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल
#शिवभोजन : ज्यांची ऐपत आहे त्यांनी 'शिवभोजन' घेऊ नये : अजित पवार
सलमान अजूनही कतरीनाच्या प्रेमात स्वत:च दिली कबुली