पुण्यात नव्या कोरोनाबाधितांचा आकडा २ हजारांच्या आत तर कोरोनामुक्तांच्या आकड्यात वाढ

pune

पुणे : गेल्या वर्षी मार्चमध्ये पुण्यात पहिल्या कोरोनाबाधित रुग्णाची नोंद करण्यात आली होती. यानंतर, शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली होती. गेल्या वर्षाच्या अखेरीस पुण्यातील दैनंदिन जनजीवन सुरळीत होत असतानाच या वर्षी पुन्हा एकदा कोरोना संसर्गाने पुण्यासह राज्यात हाहाकार माजवला आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये रेकॉर्ड ब्रेक कोरोना बाधितांची नोंद पुणे शहरात करण्यात येत होती. दरम्यान, शहरातील कडक निर्बंधांचा काहीसा परिणाम आता दिसू लागला आहे. पुणे शहरात आज नव्याने १ हजार ९३१ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता ४ लाख ५२ हजार ६४ इतकी झाली आहे. शहरातील ४ हजार ५६७ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या ४ लाख १७ हजार ५३७ झाली आहे. पुणे शहरात आज एकाच दिवसात १३ हजार ९८१ नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता २३ लाख १३ हजार ५६४ इतकी झाली आहे.

पुणे शहरात उपचार घेणाऱ्या २७ हजार १४ रुग्णांपैकी १,३९५ रुग्ण गंभीर तर ६,५०७ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. पुणे महापालिका हद्दीत नव्याने ५२ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या ७ हजार ५१३ इतकी झाली आहे.

IMP