पुण्यात पुन्हा कोरोना बाधितांच्या आकड्यात वाढ, तर मृतांच्या संख्येत घट !

pune

पुणे : कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत अधिक रुग्ण नोंदवले जात आहेत. दरम्यान, पुणे शहरात एप्रिल महिन्यात दररोज पाच ते सात हजार रुग्णांची वाढ होत होती. यामुळे पुणे शहरासह जिल्ह्यासाठी देखील ही बाब गंभीर होती. यानंतर कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने घसरल्यामुळे काहीसा दिलासा मिळाला.

१४ जूनपासून शहरात निर्बंध अधिक शिथिल झाले असून पुणे आता पूर्वपदावर येत आहे. अशातच कोरोनाचा धोका हा पूर्णपणे टळला नसून योग्य खबरदारी घेणं आवश्यक आहे. यामुळे वीकेंड म्हणजेच शनिवार आणि रविवारी पुणे शहरात निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये रुग्णसंख्येत किंचित वाढ होत असल्याचं दिसून येत होतं. तर, काल (दि. २१ जून) रोजी पुण्यात दुसऱ्या लाटेतील नीचांकी रुग्णसंख्या नोंदवण्यात आली होती. पुणे शहरात १३६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली होती.

मात्र आज (दि. २२ जून) रोजी पुन्हा एकदा कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. तर, कोरोनामुळे मृत पावलेल्या संख्येत घट झाली आहे. आज नव्याने २२० कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता ४ लाख ७६ हजार २१० इतकी झाली आहे. यासोबतच, शहरातील ३३१ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या ४ लाख ६५ हजार ३१४ झाली आहे.

ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या आता २ हजार ३५४ इतकी असून ३४२ रुग्ण गंभीर तर ४८२ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. तर, पुणे महापालिका हद्दीत नव्याने ५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या ८ हजार ५४२ इतकी झाली आहे.

महत्वाच्या बातम्या 

IMP