पुण्यात आता तुकाराम मुंढेच्या जागी नयना गुंडे

तुकाराम मुंढेंची तडकाफडकी बदली

पुणे: नाशिक महापालिकेचे आयुक्त म्हणून लवकरच तुकाराम मुंढे पदभार स्वीकारणार आहेत. आता पीएमपीएमएलमध्ये तुकाराम मुंढे यांच्या जागी नयना गुंडे यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. आपल्या तडफदार कामासाठी लोकप्रिय असलेले पीएमपीएमएलचे तुकाराम मुंढे यांची पुण्यातून बदली करण्यात आली आहे. पुण्यात त्यांनी शिस्तबद्ध कामाचा सपाटा लावला होता.

bagdure

तुकाराम मुंढे यांच्या शिस्तीचा फटका पुण्यात अनके राजकारण्यांना मिळाला. त्यामुळे पुण्यातील राजकीय नेते मुंडेंच्या विरोधात असत. मात्र कुणालाही न जुमानता शिस्तप्रिय आणि कर्तव्यनिष्ठ अधिकारी अशी ओळख मुंढेनी पक्की ठेवली. मुंढे यांची नवी मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदावरुन पुण्यात पीएमपीएमएलच्या अध्यक्ष आणि संचालकीय व्यवस्थापकपदी बदली करण्यात आली होती. नवी मुंबईत असताना राष्ट्रवादी काँग्रेसने तुकाराम मुंढे यांच्यावर अविश्वास ठराव आणला होता. राजकीय वातावरण तापल्यानंतर तुकाराम मुंढे यांची बदली पुण्यात करण्यात आली. तुकाराम मुंढे यांच्या शिस्तीचा फटका पुण्यातील राजकारण्यांनाही बसला. शिवाय कर्मचाऱ्यांनीही तुकाराम मुंढेंच्या कारभाराची धास्ती घेतली होती.

You might also like
Comments
Loading...