पुणे विभागातील एकुण 17 लाख 28 हजार 662 कोरोना बाधित रुग्ण झाले बरे

corona

पुणे : पुणे विभागातील 17 लाख 28 हजार 662 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 18 लाख 9 हजार 990 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 43 हजार 959 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 37 हजार 369 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.06  टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 95.51 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा

पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 10 लाख 73 हजार 336 रुग्णांपैकी  10 लाख 45 हजार 905 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 9 हजार 339 आहे. कोरोनाबाधित एकूण 18 हजार 92 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.69 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 97.44 टक्के आहे.

सातारा जिल्हा

सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 9 हजार 892 रुग्णांपैकी  1 लाख 96 हजार 945 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 859 आहेत. कोरोनाबाधित एकूण 5 हजार 88 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा

सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 71 हजार 477 रुग्णांपैकी 1 लाख 63 हजार 731 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 254 आहेत. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 492 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

 सांगली जिल्हा

सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 66 हजार 363 रुग्णांपैकी 1 लाख 51 हजार 602  रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 10 हजार 328 आहेत.  कोरोनाबाधित एकूण 4 हजार 433 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हा

कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 88 हजार 922 रुग्णांपैकी 1 लाख 70 हजार 479 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 13 हजार 179 आहेत. कोरोनाबाधित एकूण  5 हजार 264 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ

कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 4 हजार 327 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 1 हजार 78, सातारा जिल्ह्यात 862, सोलापूर जिल्ह्यात 643, सांगली जिल्ह्यात 892  तर कोल्हापूर जिल्ह्यात 852 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण  

पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 4 हजार 826 आहे. पुणे जिल्हयामध्ये 1 हजार 377, सातारा जिल्हयामध्ये 1 हजार 156, सोलापूर जिल्हयामध्ये 279, सांगली जिल्हयामध्ये 920 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 1 हजार 94 रुग्णांचा समावेश आहे.

पुणे विभागातील सर्व्हेक्षण

आजपर्यत विभागामध्ये एकुण 1 कोटी 21 लाख 26 हजार 660 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 18 लाख 9 हजार 990 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP