पुण्यात आज नव्याने २३९ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर ‘इतके’ रुग्ण कोरोनामुक्त

pune corona

पुणे : कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत अधिक रुग्ण नोंदवले जात आहेत. दरम्यान, पुणे शहरात एप्रिल महिन्यात दररोज पाच ते सात हजार रुग्णांची वाढ होत होती. यामुळे पुणे शहरासह जिल्ह्यासाठी देखील ही बाब गंभीर होती. मात्र, आता कोरोना रुग्णांच्या आकड्यात मोठी घट होत असून कोरोना बाधितांची संख्या देखील अधिक आहे.

पुणे शहरात आज नव्याने २३९ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून पुणे शहरातील एकूण संख्या आता ४ लाख ७३ हजार ५३९ इतकी झाली आहे. शहरातील ३६७ कोरोनाबाधितांना आज डिस्चार्ज देण्यात आला असून पुणे शहरातील एकूण डिस्चार्ज संख्या ४ लाख ६१ हजार ७६३ झाली आहे. पुणे शहरात आज एकाच दिवसात ६ हजार ७६ नमुने घेण्यात आले आहेत. पुणे शहराची एकूण टेस्ट संख्या आता २५ लाख ६७ हजार ४१२ इतकी झाली आहे.

पुणे शहरात उपचार घेणाऱ्या ३ हजार ३२० रुग्णांपैकी ५१९ रुग्ण गंभीर तर ९२३ रुग्ण ऑक्सिजनद्वारे उपचार घेत आहेत. पुणे महापालिका हद्दीत नव्याने ९ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.आजच्या नव्या संख्येसह मृतांची एकूण संख्या ८ हजार ४५६ इतकी झाली आहे.

पुणे शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची घटती संख्या विचारात घेता पुणे शहरातील निर्बध शिथील करण्यात येणार आहे. येत्या सोमवारपासून कोरोना निर्बंध शिथिल करण्यासंदर्भात निर्णय लागू केला जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली. सोमवारपासून (14 जून) पुण्यातील मॉल्स उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर सर्व दुकानं रात्री सात वाजेपर्यंत खुली राहतील. याशिवाय सोमवारपासून अभ्यासिका, वाचनालय सुरु करण्यास देखील परवानगी देण्यात आली आहे. तर, नागरिकांनी काळजी घ्यावी, असंही अजित पवार यांनी सांगितले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP