Share

Shivsena । “संसदेत ‘गोडसे’ शब्द असंसदीय ठरवला तसा ‘शिंदे’…”; शिवसेनेचा हल्लाबोल

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र ‘सामना’तून (Samana) आज शिंदे गटावर चांगलाच निशाणा साधला आहे. “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी प्रचंड कष्टातून निर्माण केलेली शिवसेना दिल्लीतील राज्यकर्त्यांनी कपट-कारस्थानाचे घाव घालून कागदोपत्री संपवली असल्याचा दावा शिवसेनेनं सामना च्या माध्यमातून केला आहे.

“शिंदे नावाचे गृहस्थ आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी आहेत व ते सत्तेच्या बळावर राज्यात प्रतिशिवसेना स्थापन करू पाहत आहेत. हे म्हणजे मोगलांत सामील झालेल्या एखाद्या गद्दाराने ‘‘शिवराय कोण? हिंदवी स्वराज्याचे खरे मालक आम्हीच!’’ असा दावा करण्यासारखे आहे. महाराष्ट्रात दोन शिवसेना निर्माण करून दुष्मनांनी त्यांचे काम केले आहे. शिंद्यांनी हरून अल रशीदप्रमाणे वेषांतर करून संध्याकाळनंतर बाहेर पडावे व जनता आपल्याविषयी काय बोलतेय ते समजून घ्यावे,” असा टोला एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना ‘रोखठोक’मध्ये लगावला आहे.

शिंद्यांच्या इतिहासाला, परंपरेला काळिमा फासला

शिंदे नावाचा एक इतिहास आहे. तो इतिहास इमानाचा आणि शौर्याचा आहे, पण आताच्या शिंद्यांमुळे अनेक शिंदे खजील झाले. संसदेत ‘गोडसे’ हा शब्द असंसदीय ठरवला तसा ‘शिंदे’ शब्द महाराष्ट्रात तिरस्करणीय, असंसदीय ठरेल काय? ‘लखोबा लोखंडे’स पर्यायी शब्द म्हणून सध्याच्या शिंद्यांचा उल्लेख होऊ शकतो. या घडीस एकनाथ शिंदे यांचे वर्तन महाराष्ट्रात सगळ्यात तिरस्करणीय ठरत आहे. ‘एकनाथ शिंदे’ हे नाव ‘most hated speech’ प्रमाणे ‘most hated name’ ठरत आहे. इतर सर्व निष्पाप, कर्तबगार शिंद्यांची क्षमा मागून हे लिहावे लागते. एका शिंद्याने महाराष्ट्राच्या पाठीत खंजिरावर खंजीर खुपसून शिंद्यांच्या इतिहासाला, परंपरेला काळिमा फासला आहे!

एकनाथ शिंदेही आठवड्यातून एकदाच मंत्रालयात जातात

मुख्यमंत्री आठवड्यातून एकदाच मंत्रालयात जातात उद्धव ठाकरे हे मंत्रालयात जात नाहीत, असा शिंदे व फडणवीस यांचा आक्षेप होता, पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे फक्त आठ दिवसांतून एकदाच कॅबिनेटच्या दिवशी मंत्रालयात जातात हे आता समोर आले. मुख्यमंत्र्यांचे कार्यालय त्यांच्या टोळीचे आमदारच चालवितात. मुख्यमंत्री म्हणून मी जनतेची सेवा करतोय, असे एकनाथ शिंदे वारंवार सांगतात. शिंदे कोणती सेवा करतात ते आता स्पष्ट झाले. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना कारवाईच्या धमक्या देऊन आपल्या गटात आणणे हीच त्यांची जनसेवा, असा टोलाही ‘रोखठोक’मधून लगावण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या :

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र ‘सामना’तून (Samana) आज शिंदे गटावर चांगलाच निशाणा साधला आहे. “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now