परभणी : जिंतूर शहरातील अण्णाभाऊ साठे चौकात संचारबंदी दरम्यान विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्या नागरिकांची स्थानिक प्रशासनाकडून सोमवार दिनांक १७ मे रोजी कोरोना चाचणी करण्याची मोहीम राबविण्यात आली होती. या दरम्यान सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास कर्तव्यावर असणारे जिंतूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस उपनिरीक्षक अर्जुन पवार व एका तरूणात वाद झाल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्याने शिवीगाळ करत, लाथा मारून तरुणाच्या कानशिलात लगावल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच शहरात नव्हे जिल्हाभरात पोलिसांच्या या कारवाईबद्दल संताप व्यक्त होत आहे. कर्तव्यदक्ष पोलिस अधीक्षक मिना यांचे पोलीस जर शेतकऱ्यांना धरुन भर बाजारात मारत असतील तर न्याय कुणाकडे मागायचा असा संतप्त सवाल शेतकऱ्यांमधून विचारल्या जात आहे. परभणी जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक जयंत मीना याप्रकाराबद्दल काय भूमिका घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
लॉकडाऊन काळात मुभा दिलेल्या व्यक्तीशिवाय ईतर कुणीही रस्त्यावर विनाकारण फिरु नये. यासाठी काल प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून नागरिकांची कोविड चाचणी करण्यात आली होती. मात्र जिल्हाधिकारी यांनी जाहीर केलेल्या आदेशात शेतकऱ्यांना अडचणी निर्माण होऊ नये यासाठी कृषीकेंद्र उघडण्यास परवानगी दिली आहे. मारहाण झालेला तरुण हा शेती विषयक साहित्य खरेदीसाठी शहरात आल्याचे सांगण्यात आले.
यापूर्वीही पोलिसांनी मारहाण केल्याच्या आरोपावरुन एका फिरत्या कापड व्यापाऱ्याने गळफास लावून जीवनयात्रा संपवली होती. तर काही दिवसांपुर्वी भरचौकात पोलिस उपनिरीक्षक आणि एका किराणा दुकान व्यापारी यांच्यात जोरदार वाद झाला होता. आता पुन्हा या व्हायरल व्हिडीओमुळे नागरिकांमधून राग व्यक्त होत आहे.
महत्वाच्या बातम्या
- आवरा यांना ! भाजप नेता कोरोनाला घालवण्यासाठी यज्ञ कुंड घेऊन रस्त्यावर फिरतोय…
- अखेर ‘त्या’ वादावर पडदा ; जयंत पाटलांच्या प्रकल्पांना मंजूरी
- ‘राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा आता दहा जून पासून घेण्यात येणार’- अमित देशमुख
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जाणार कोकण दौऱ्यावर; चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करणार !
- ‘चंद्रकांतदादा, मोदींचा राजीनामा घेऊन निवडणुका घ्याच, मग समजेल जनतेच्या मनात काय आहे’