परदेशात काळा पैसा दडवणाऱ्यांच्या यादीत काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांची नावं

congress leaders

नवी दिल्ली – केंद्र सरकारच्या नोटाबंदी निर्णयाला 8 नोव्हेंबरला एक वर्ष पूर्ण होत आहे. हा दिवस ‘अॅन्टी ब्लॅक मनी डे’ म्हणून साजरा करण्याची सर्वत्र तयारी सुरू आहे. मात्र नोटाबंदी निर्णयाच्या वर्षपूर्तीनिमित्त कॉंग्रेसने बुधवार दि. ८ नोव्हेंबर रोजी जनआक्रोश आंदोलनाची हाक दिली आहे .जर्मनीतील ‘सुददॉइश झायटुंग’ या वृत्तपत्रानं काळा पैशांसंदर्भातील नवा गौप्यस्फोट केला असून भारतातील अनेक दिग्गज कॉंग्रेस नेत्यांचाच या यादीत समावेश असल्याचं समोर आल्याने राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत

काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांची नावं

पॅराडाईज पेपर्समधील कागदपत्रांनुसार, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक सिंह गहलोत, माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचे चिरंजीव किर्ती चिदंबरम, माजी केंद्रीय मंत्री सचिन पायलट आणि माजी केंद्रीय मंत्री वायलार रवी यांचे चिरंजीव रवी कृष्णा यांचे झिकित्झा हेल्थ केअर लिमिटेड या कंपनीशी संबंध आहेत. या कंपनीची ईडी आणि सीबीआयची आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी चौकशीही करण्यात आलेली आहे. या कंपनीने मॉरिशिअसमधील कंपनीकडून पैसे घेतले होते.यूपीए सरकारमधील माजी केंद्रीय मंत्री विरप्पा मोईली यांचे चिरंजीव हर्ष मोईली यांनी मोक्ष युग अक्सेस ही कंपनी स्थापन केली. या कंपनीत मॉरिशिअसमधील युनिट्स इम्पॅक्ट पीसीसी या कंपनीने गुंतवणूक केली. मात्र ही कंपनी सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडूनच स्थापन करण्यात आली. वडील मंत्री होण्याच्या अगोदर कंपनीची स्थापना करण्यात आली होती, असं स्पष्टीकरण हर्ष मोईली यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना दिलं.

भाजप नेत्यांचाही समावेश

भाजप खासदार रवींद्र किशोर यांनी एसआयएस या सिक्युरिटी कंपनीची स्थापना केल्याचं कागदपत्रांमधून समोर आलं आहे. या ग्रुपच्या दोन ऑफशोअर कंपन्या आहेत. रवींद्र किशोर यांनी 2014 च्या राज्यसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात या कंपन्यांचा उल्लेख केलेला नाही. मात्र सेबीकडील या कंपन्यांची सर्व औपचारिकता पूर्ण करण्यात आलेली आहे.

जंयत सिन्हा, भाजप खासदार आणि केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री

पॅराडाईज पेपर्समधील कागदपत्रांनुसार, खासदार होण्यापूर्वी भाजप नेते जयंत सिन्हा हे ओमीदयार नेटवर्कचे भारतातील व्यवस्थापकीय संचालक होते. या कंपनीने अमेरिकेतील कंपनी डी. लाईटमध्ये गुंतवणूक केली होती. मात्र त्यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात, लोकसभा सचिव किंवा पंतप्रधान कार्यालयाला दिलेल्या माहितीत याचा उल्लेख केलेला नाही.

दरम्यान, ओमीदयार कंपनीने 2009 ते 2013 या काळात जी गुंतवणूक केली आहे, त्याचं व्याज घेण्याचे हक्क असतील, असं जयंत सिन्हा यांनी पीएमओला 2016 मध्ये दिलेल्या माहितीत म्हटलेलं आहे. शिवाय हेच त्यांनी 2014 साली निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रातही म्हटलं होतं. ओमीदयार कंपनीचा विश्वस्त म्हणून सर्व व्यवहार कायदेशीरपणे पार पाडलेले आहेत. हे सर्व व्यवहार संबंधित प्राधिकरणाकडून आवश्यक सर्व कागदपत्रांद्वारे पूर्णपणे उघड झाले आहेत. ओमीदयार नेटवर्क सोडल्यानंतर स्वतंत्र संचालक म्हणून राहण्याबद्दल डी. लाईटला सांगितलं. मात्र मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर डी. लाईटसह सर्व पदांचा राजीनामा दिला. डी. लाईटसाठी जे व्यवहार केले ते ओमीदयारचा प्रतिनिधी म्हणून केले, ते कोणत्याही वैयक्तीक हेतूसाठी करण्यात आले नाही, असं स्पष्टीकरण जयंत सिन्हा यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना दिलं.

Loading...