आपल्या देशात व्यंगचित्रकारला किंमतच नाही – राज ठाकरे

टीम महाराष्ट्र देशा : “आपल्या देशात व्यंगचित्रकारला किंमतच नाही. जेव्हा आरके लक्ष्मण गेले तेव्हा मोजून शंभर लोकही त्यांचे अंत्यंदर्शन घेण्यासाठी आले नव्हते,” अशी खंत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली. तसंच “ज्या आरके लक्ष्मण यांची ही अवस्था असेल तर इतरांचं काय बोलायचं,” असंही ते म्हणाले. विकास सबनीस यांच्या 50 वर्षांच्या कारकीर्दीचा विशेष गौरव सोहळा राज ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थित शिवाजी पार्क इथल्या सावरकर सभागृहात पार पडला, त्यावेळी ते बोलत होते.

व्यंगचित्र कारकिर्दीच्या पन्नाशीनिमित्त ‘रेषा विकासची भाषा 50 वर्षांची’ या विशेष कार्यक्रमात विकास सबनीस यांचा गौरव करण्यात आला. “पाच वर्षात विकास दिसला की नाही याची मला कल्पना नाही, पण 50 वर्षात मला विकास सबनीस यांच्या रुपाने दिसला,”अशी कोपरखळीही राज ठाकरेंनी मारली. “आज युरोप किंवा बाहेरच्या देशात कलाकारांना जी किंमत आहे, ती आपल्या देशात नाही,”असंही ते म्हणाले. “गेली 50 वर्ष व्यंगचित्र कला सोडून कोणतीही नोकरी केलेली नाही. ही कला 50 वर्ष जोपासणं हे आरके लक्ष्मण, बाळासाहेब ठाकरे आणि त्यानंतर विकास सबनीस यांचं नाव घ्यावं लागेल,”असंही राज ठाकरे यांनी सांगितलं.

https://www.youtube.com/watch?v=ZDYSgivQ3pU&t=628s