व्यापाऱ्यांच्या संगनमताने शेतमालावर डल्ला मारणारी टोळी पोलिसांनी सापळा रचून केली जेरबंद

theif

उस्मानाबाद: शेतकऱ्यांनी कर्ज काढून कष्टाने उगवलेल्या शेतमालची चोरी करणारी टोळी अखेर उस्मानाबाद स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना पकडण्यात यश आले आहे. सोमवारी दि. १४ जून रोजी ही कारवाई करण्यात आली. आश्चर्याची बाब म्हणजे या टोळीत दोन व्यापऱ्यांचा देखील समावेश होता. वर्षभर मेहनत करून शेतकऱ्यांचा माल लंपास करणाऱ्या टोळीला पकडण्यात यश आल्याने शेतकरी वर्गात समाधान आहे. पोलिस अधीक्षक राजतिलक रोषण स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिस निरीक्षक गजानन घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक करन माने व इतर सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.

या चोरट्यांची चोरी करण्याची देखील अनोखी पद्धत होती. पाच ते सातजण एका वाहनातून चोरीसाठी रात्रीची वेळ निवडायचे. कोणालाही वाहनाचा आवाज येऊ नये. यासाठी गोडाऊनपासून अर्धा किलोमीटर अंतरावर वाहन थांबविले जायचे. विशेष म्हणजे पावलांचा आवाज येऊ नये. यासाठी सर्वजण रस्त्याच्या खाली उतरून शेतातून गोडाऊनच्या दिशेने जात असत. कानोसो लागण्याच्या आतच १५ ते २० मिनिटांत ४० ते ५० कट्टे गाडीत टाकून तेथून पसार होत असत. रात्रीच्या वेळी चोरी करणाऱ्या या चोरांची शेतकरी वर्गात चांगलीच भीती निर्माण झाली होती.

जिल्ह्यातील सकनेवाडी येथील सुर्यातेज, वरुडा रस्त्यावरील ओडीएसएफ, येरंडागव (ता. कळंब) येथील शेतकरी, खामगाव (ता. उस्मानाबाद) येथील गणराज्य अॅग्रो प्रोड्युसर कंपनीच्या गोडाऊनमधून या टोळीने सोयाबीन, हरभऱ्याचे कट्ट्यावर डल्ला मारला होता. याशिवाय जिल्ह्याच्या इतरही भागात ही टोळी कार्यरत होती. या टोळीतील दादा चव्हाण, अनिल चव्हाण, युवराज काळे, महादेव चव्हाण, विकास चव्हाण, आबा शिंदे, अंकुश शिंदे यासह सुधाकर जाधव व वैभव आप्पासाहेब आष्टेकर या दोन व्यापाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून सहा लाख ६० हजार ६०७ रुपयांचा माल जप्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या

IMP