उस्मानाबादमध्ये राष्ट्रवादीला खिंडार, ‘हा’ बडा नेता भाजपच्या वाटेवर

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेत्यांनी पक्षांतर केले आहे. हे पक्षांतर खासकरून भाजप आणि शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणावर होत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांनी विधानसभा निवडणुकीचे औचित्य साधत भाजप – सेनेमध्ये पक्षांतर केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसला ऐन निवडणुकीच्या तोंडावर खिंडार पडले आहे. आता उस्मानाबादचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते राणाजगजितसिंह पाटील उद्या भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. मात्र या पक्षांतराला उस्मानाबादच्या स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी विरोध केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून राणाजगजितसिंह पाटील हे भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. त्या दृष्टीने त्यांनी भाजप नेत्यांशी भेटीगाठी देखील वाढवल्या होत्या. मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यांकडून राणाजगजितसिंह पाटील कोणतेही पक्षांतर करणार नाहीत असा विश्वास दाखवला होता. मात्र या विश्वासाला तडा जाणार असल्याचं दिसत आहे. कारण राणाजगजितसिंह पाटील उद्या भाजपात प्रवेश करणार असल्याची दाट शक्यता आहे.

दरम्यान लोकसभा निवडणुकीत उस्मानाबाद मतदारसंघातून युतीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्याकडून राणाजगजितसिंह यांचा दारूण पराभव झाला होता. त्यामुळे राणाजगजितसिंह यांनी विधानसभा निवडणुकीत लोकसभेचा पराभव खोडून काढण्यासाठी भाजपमध्ये जाण्याचा विचार केला असल्याचं दिसत आहे.

शिवस्मारकाच्या कामाचा पत्ता नाही मात्र स्मारक अध्यक्ष मेटेंसाठी 20 लाखांची अलिशान कार

बच्चू कडू आणि आदित्य ठाकरेंची भेट, येत्या निवडणुकीत एकत्र दिसण्याची शक्यता

पूर्वी ‘चिडी’चा डाव खेळायचे, आता ‘ईडी’चा डाव खेळतात : जितेंद्र आव्हाड