तुंबापुरीतील नागरिकांना वाचवण्यासाठी भारतीय नौदल उतरले रस्त्यावर

टीम महाराष्ट्र देशा : गेल्या दोन दिवसाच्या पावसामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचलं आहे.त्यामुळे मुंबईकरांना पावसाला सुरवात होताच हालपेष्टा सहन कराव्यालागत आहेत. तर अनेक ठिकाणी रस्ता खचण्याच्या आणि भिंतं कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाने वेळीच खबरदारी घेत शासकीय कार्यालयांना, शाळांना सुट्टी घोषित केली आहे.

तर कुर्ला परिसरात अडकलेल्या मुंबईकरांच्या मदतीसाठी भारतीय नौदल रस्त्यावर उतरलं आहे.सतत सुरु असलेल्या पावसामुळे सखल ठिकाणी पाणी साचलं आहे. मुंबई महापालिकेने भारतीय नौदलाला बचावकार्यात मदत करण्यासाठी विनंती केली होती. यानंतर कुर्ला परिसरात अडकलेल्या मुंबईकरांच्या मदतीसाठी भारतीय नौदलाचे जवान रस्त्यावर उतरले आहे.

तानाजी आयएएनएस च्या जवानांनी बाचावकार्याला सुरवात केली आहे. तसेच पाण्यात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षा स्थळी हलवले जात आहे. बचावकार्यासाठी आयएनएस तानाजी आणि होड्या, शिड्या, दोरी अशा गरजेच्या गोष्टी उपलब्ध करुन देण्यासाठी उपकरण व्यवस्थापन टीम तात्काळ सक्रीय झाली आहे.

दरम्यान या पावसामुळे अजून एक धक्कादायक प्रकार घडला आहे. चांदीवली येथील संघर्ष नगर रस्ता पावसाच्या पाण्यात वाहून गेला आहे. त्यामुळे प्रशासनाने परिसरातील स्थानिक इमारतीतील रहिवाशांना घरे रिकामी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र काही रहिवाशी घर रिकाम करण्यास तयार नाही.