धक्कादायक! नागपूरमध्ये भाजप कार्यकर्त्यासह कुटुंबातील पाच जणांची निघृण हत्या

नागपूर : एकाच कुटुंबातील पाच जणांची निर्घृण हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार नागपूरमध्ये घडलाय, नागपुरातील दिघोरी येथे भाजप नेते कमलाकर पोहनकर यांच्यासह कुटुंबातील पाच जणांची आज पहाटे हत्या करण्यात आलीये. दरम्यान या प्रकाराने नागपूरमध्ये एकच खळबळ उडाली असून, तर्क – वितर्कांना उधान आलय.

कमलाकर पोहनकर यांच्यासहीत कुटुंबातील पाच जणांना जीवे ठार मारण्यात आले आहे. मृतांमध्ये लहान मुलगा-मुलगी आणि वृद्ध व्यक्तीचा समावेश आहे. कमलाकर पोहनकर, वय ५१ वर्ष, वंदना पोहनकर, वय ४० वर्ष, वेदानी पोहनकर, वय १२ वर्ष, मीराबाई पोहनकर, वय ७२ वर्ष, कृष्णा पालटकर, वय २ वर्ष अशी मृतांची नावे आहेत.

दरम्यान, कमलाकर पोहनकर हे भाजपाचे कार्यकर्ते असल्याची माहिती समोर आली आहे. कमलाकर पोहनकर आणि त्यांचे कुटुंबीय झोपेत असताना त्यांची धारदार शस्त्रानं हत्या करण्यात आली. ओळखीच्या व्यक्तीनेच हत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

You might also like
Comments
Loading...