मंत्री अब्दुल सत्तारांच्या गावातच कोरोना नियमांची ऐशीतैशी

औरंगाबाद : जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्ण वाढत असताना, मंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदार संघात नियमांची ऐशी कि तैशी, मात्र कोरोना पासून बचाव करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कुठल्याही नियमांचे पालन केल्या जात नसल्याने सिल्लोडला कोरोनाचा हॉटस्पॉट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

वाढत्या कोरोनाला लक्षात घेऊन जिल्ह्यातील बऱ्याच ठिकाणी प्रशासकीय यंत्रणेमार्फत कोरोनाचा शिरकाव होऊ नये म्हणून, शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचा प्रयत्न केला जात असताना. मंत्री सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघात मात्र, शासकीय यंत्रणा ही उदासीन दिसत असल्याचे चित्र दिसत आहे.

जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये गर्दी होऊ नये म्हणून काही ठिकाणी आठवडी बाजार बंद करण्याचा निर्णय झालेला असला तरी, सिल्लोड शहरात तसेच तालुक्यात कुठल्याही प्रकारच्या उपाययोजना राबविल्या जात नसल्याने कोरोना वाढीची भीती मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे.

बस स्थानकावर ही बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशांना सहज सिल्लोड शहरात प्रवेश असल्यामुळे एखादा लागण झालेला रुग्ण शहरात आल्यास त्याचा मोठ्या प्रमाणात संसर्ग होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. याबाबत प्रशासकीय यंत्रणेने कडक पावले उचलण्याची गरज असून कोरोनाला सिल्लोड शहरात येण्यापूर्वीच थोपविणे गरज असल्याचे नागरिक म्हणत आहे.

महत्त्वाच्या बातम्या