मावळमध्ये रंगणार पवार वि. बारणे हाय व्होल्टेज लढत

टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आज २१ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये मावळ लोकसभा मतदार संघासाठी विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना उमेदवारी दिली आहे. यावेळी श्रीरंग बारणे यांची लढत राष्ट्रवादीचे युवानेते तसेच अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचाशी होणार आहे.त्यामुळे आता मावळमध्ये हाय व्होल्टेज लढत पहायला मिळणार आहे.

श्रीरंग बारणे यांनी २०१४ च्या निवडणुकीत शेकापचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांचा १ लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने पराभव केला होता. या निवडणुकीत श्रीरंग बारणे यांच्या समोर आव्हान जरी नवख्या उमेदवाराचे असले तरी त्या उमेदवाराच्या कुटुंबाचा राजकारणातील व्यास मोठा आहे. त्यामुळे ही लढत बारणेंसाठी आव्हानात्मक असणार आहे.

मावळच्या खालच्या भागातील म्हणजेच कर्जत , उरण , पनवेल या भागात जयंत पाटील यांच्या शेतकरी कामगार पक्षाचे चांगलेच वर्चस्व असल्याने तसेच कॉंग्रेस – राष्ट्रवादी आणि इतर पक्ष यांची महाआघाडी असल्यामुळे मावळ मधून पार्थ पवार यांना फायदा होण्याची शक्यता आहे. हे सगळे असले तरी जनता कोणाच्या बाजूने कौल देणार आहे हे मात्र मतपेटीच ठरवेल.

Loading...