‘मावळमध्ये विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे जे उमेदवार निवडून आले ते आधी भाजपचे उपनगराध्यक्ष होते’

'मावळमध्ये विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे जे उमेदवार निवडून आले ते आधी भाजपचे उपनगराध्यक्ष होते'

मुंबई : मावळच्या निष्पाप शेतक-यांवर पोलिसांनी बेछूट गोळीबार केला त्यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसेचे सरकार सत्तेवर होते व तेव्हा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार होते. त्यावेळी शेतक-यांचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न झाला. पण आता आपली जबाबदारी झटकून त्या गोळीबाराच्या घटनेसाठी पोलिसांना जबाबादार धऱले जात आहे व त्या घटनेचे खापर पोलिसांवर फोडण्याचा सध्याच्या सत्ताधा-यांचा प्रयत्न दुर्दैवी व केविलवाणा असल्याची जोरदार टिका विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केली आहे.

पवार यांच्या मुद्दयाला प्रत्युत्तर देताना दरेकर यांनी स्पष्ट केले की जो राष्ट्रवादीचे जे उमेदवार मावळ निवडणुकीत निवडून आलेले आहे ते उमेदवार आधी भाजापचे उपनगराध्यक्ष होते.भाजपने स्थानिकांना प्रोत्साहित केले नाही तर  शेतक-यांच्या अंसतोषाला वाचा फोडण्याचे काम भाजपने केले होते. पण ते आंदोलन चिरडून टाकण्याचा निर्णय तत्कालिन सरकारने घेतला होता. त्या वेळेला बेछूट गोळीबार झाला. आता मावळचे खापर पोलिसांवर फोडले जात आहे. सत्ताधाऱ्यानी त्या वेळेला केलेल्या अत्याचार, गोळीबाराचे खापर पोलिसांवर फोडण्याचे दुर्दैवी आणि केविलवाणे काम सत्ताधारी पक्षाकडून असल्याची जोरदार टीकाही दरेकर यांनी यावेळी केली.

पुढे बोलताना दरेकर यांनी ड्रग्ज च्या मुद्यावरून देखील हल्लाबोल केला.ते म्हणाले, ड्रग्जचा विळखा महाराष्ट्राला पडतोय, तरुण व्यसनाधीन होतोय यावर पवार साहेबांसारख्या जेष्ठ नेत्याने चिंता व्यक्त करायला पाहिजे. त्यादृष्टीने राज्याची असो किंवा केंद्राची तपास यंत्रणा चांगला तपास करत असेल तर पवार साहेबांनी त्या यंत्रणांची पाठ थोपटायला पाहिजे. परंतु नवाब मलिक ड्रग्ज तस्करांची बाजू घेऊन आपल्याच तपास यंत्रणाना बदनाम करत असतील तर ते थांबवण्याची सूचना पवार साहेबांनी त्यांना द्यायला पाहिजे होती. परंतु पवार साहेबांच्या अशा वक्तव्यामुळे ड्रग तस्करांच्या कारवायांना बळ मिळाल्याचे दिसून येते.राज्य सरकारचा मुख्य आक्रोश आहे की, ज्या तपास यंत्रणा आहेत त्यांचा केंद्र सरकारकडून गैरवापर होत आहे. उलट तपास यंत्रणा चांगले काम करत आहेत म्हणून त्यांचे अभिनंदन केले पाहिजे पण टीका केली जाते.

ते म्हणाले, वाझेचे धागेदोरे शोधून काढल्यामुळे राष्ट्रवादीच्या गृहमंत्र्याला राजीनामा द्यावा लागला आणि त्यातूनच अशा प्रकारची टीका दुर्दैवाने होत आहेत. या सर्व गोष्टी न्यायालयाच्या अखत्यारीत आहेत. न्यायालयात सादर केलेल्या पुराव्याच्या आधारे हा सर्व तपास सुरू आहे. म्हणून या तपासावर टीका करणे उचित नाही. माजी गृहमंत्र्यांची अनेक वेळा पाठराखण केली गेली. सर्वोच्च न्यायालयात देशमुख गेले तरी त्यांची बाजू तिथे लंगडी ठरली. म्हणून देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला असे स्पष्ट करतानाच दरेकर यांनी सांगितले की, लखीमपूरच्या घटनेचे कोणीही समर्थन केलेले नाही. कायद्याला अभिप्रेत असलेली कारवाई करण्यात येत आहे. हे प्रकरणही न्यायालयात आहे. योगी सरकारने कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे. तरीही केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा मागितला जातोय.

मी फडणवीस यांचे अभिनंदन करतो असा उल्लेख पवार यांनी केला. त्याला प्रत्युत्तर देताना दरेकर म्हणाले की, कोणत्याही मुख्यमंत्र्यांना आपण मुख्यमंत्री म्हणून केलेल्या कामाचं विस्मरण होता कामा नये. यात या पदाचा मोठेपणा सांगण्याचा प्रयत्न होता, तो मिरविण्याचा नाही. त्यामुळे केवळ सत्ताधारी पक्षातील नेत्यांमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल किती पोटशूळ आहे हे रोज आपल्याला बघायला मिळते. यावर मलिक यांनी वक्तव्य करणे ठिक आहे, पण पवार साहेब यांनीही आपण चार वेळा मुख्यमंत्री होतो ही आठवण करुन द्यावी लागते. हे सत्ताधा-यांमधील पोटशूळ आहे. फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी त्या काळात अतिवृष्टीमुळे उध्दवस्त झालेल्या शेतक-यांनी उत्तम मदत मिळवून दिली. त्यामुळे फडणवीस हे विरोधी पक्ष नेते असले तरीही आजही राज्यातील जनतेचा त्यांच्यावर विश्वास आहे. ते विरोधी पक्ष नेते म्हणूनच सत्ताधारी नेत्यांपैकी यशस्वी आहेत व राज्यातील जनतेच्या प्रश्नाला न्याय देण्याचे काम ते करीत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या