तलवारी मिरवून दहशत निर्माण करणाऱ्या पाच जणांना अटक,पोलिसांची धडक कारवाई

मालेगाव- मालेगाव शहरातील आझादनगर भागात विविध प्रमुख रस्त्यांवर तलवारी मिरवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणारया पाच जणांना अटक करण्यात आली. शरीफ अहमद उर्फ शरीफ मस्सा, इम्तीयाज अहमद, इरफान अहमद, उर्फ राजू चि-या, आकीब अहमद व आबीद अहमद या पाच संशयीतांचा समावेश आहे.

तलवारी मिरवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर पोलिसांनी धडक कारवाई केली.शुक्रवारी रात्री पवारवाडी पोलिसांनी ही कारवाई केली. अटक केलेल्या संशयितांकडून दोन दुचाकी, तीन तलवारी व रोख तीन हजार रूपये असा 63 हजार 500 रूपयांचा ऐवज जप्त केला. यात उपअधिक्षक रत्नाकर नवले, सहाय्यक निरीक्षक सचिन वांगडे व सहकारींनी ही कारवाई केली. या संशयीतांना सीसीटीव्ही फुटेजवरून अटक करण्यात आली.

कोरेगाव-भीमा हिंसाप्रकरणी 12 जणांना अटक