बर्ड फ्लूचा कहर ; ‘या’ राज्यातील जवळपास 27 जिल्ह्यातील पक्षांना झाली लागण

bird flu

भोपाळ : मध्य प्रदेशमध्ये जवळपास 27 जिल्ह्यात बर्ड फ्लूची लागण झाल्याचे आढळून आले. केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे जिल्हा प्रशासन प्रभावित क्षेत्रामध्ये स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण करत आहे. हारडा जिल्ह्यातील रहाटगाव मध्ये बर्ड फ्लू ची लागण झाल्याचे आढळले.

प्रभावित क्षेत्राच्या 1 किलोमीटर परिघातील इतर प्राण्यांचे कत्तलीचे प्रमाण कमी केले जाईल. तसेच प्रभावित क्षेत्राच्या 1 ते 9 किलोमीटर परिघातील प्राण्यांचे नमूने तपासणीसाठी घेतले जातील. प्रभावित क्षेत्रातील पोल्ट्री उत्पादनांच्या वाहतुकीवर पुढील 3 महिन्यांसाठी बंदी घालण्यात आली आहे .

दरम्यान, महाराष्ट्रासह देशभरातील विविध राज्यात पसरलेल्या बर्ड फ्लू च्या पार्श्वभूमीवर अंडी, कोंबड्या आणि अन्य पोल्ट्री उत्पादनाच्या विक्रीत ५० टक्क्यांहून अधिक घट झाली आहे . एका बाजूला राज्याच्या पशुसंवर्धन विभागातर्फेही चिकन महोत्सवाचं आयोजन करुन पोल्ट्री उत्पादनं खाण्यासाठी सुरक्षित असल्याची मोहीम राबवली जात असली तरी प्रत्यक्षात मात्र अनेक जण मटणाकडे वळल्याचं चित्र आहे.

राज्यातील कोणत्याही गावांमध्ये कावळे, पोपट, बगळे किंवा स्थलांतरीत होणारे पक्षी मृत झाल्याचे आढळून आल्यास किंवा व्यावसायिक पोल्ट्री फार्म मधील पक्षांमध्ये नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात मृत झाल्याचे निदर्शनास आल्यास, तात्काळ नजिकच्या पशुवैद्यकिय दवाखा मध्ये याची माहिती द्यावी. तसेच पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या टोल फ्री दूरध्वनी क्रमांक १८००२३३०४१८ वर त्वरीत दूरध्वनी करुन त्याची माहिती द्यावी, असे आवाहन पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी नागरिकांना केले आहे.

महत्वाच्या बातम्या