Vaibhav Naik | सिंधुदुर्ग : राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळत आहे. अशातच वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी निलेश राणेंनी लोकशाहीच्या मार्गाने निवडणुकीत उभं राहून दाखवावे असं खुलं आव्हान दिलं आहे. नारायण राणेंचा (Narayan Rane) २०१४ ला पराभव केला आता निलेश राणेंनादेखील पराभूत करू असेही नाईक यांनी म्हटले. आपण उद्धव ठाकरे यांची साथ सोडून जाणार नसल्याचही त्यांनी स्पष्ट केलं.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी हिम्मत असेल तर निलेश राणे (Nilesh Rane) यांनी (सन 2024) मध्ये आपल्या विरुद्ध निवडणूक लढवूनच दाखवावी असे आव्हान राणेंना दिले आहे. आमदार नाईक म्हणाले यापर्वी मी नारायण राणेंना पराभुत केले आहे. जर तुम्ही खरे राणे असाल तर माझ्या समोर येणाऱ्या निवडणुकीला सामोरे जा. निलेश राणे मात्र निवडणुकीत उभं राहण्याचं धाडसही करणार नाहीत आणि भाजपही त्यांना तिकिट देणार नाही असा टोलाही नाईक यांनी लगावला.
वैभव नाईक यांनी म्हटले की, भाजपने संविधान समर्थन रॅली काढून संविधानाच्या विरोधात भूमिका घेतली. भाजप सोबत येत नाहीत त्याना जेलमध्ये टाकू असं भाषणात म्हणत होते. भाजपच्या संविधान समर्थन रॅलीत जे होते ते भाजपची सत्ता आल्यानंतर गेले होते. मला भाजपमध्ये येण्यासाठी दवाब तंत्र वापरत असलात तर मी त्याला भीक घालणार नाही. मी चौकशीला सामोरे जाईन. माझ्याकडे एक रुपया जरी बेहिशेबी आढळला तर मला फाशी द्या असं जाहीर आव्हान देतोय असे नाईक म्हणालेत.
भास्कर जाधव आणि मी चुकीचे वागलो असल्यास अटक करा. आम्ही उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहिलो म्हणून कारवाई करत असाल तर खुशाल करा. पण आम्ही शिवसेनेची साथ सोडणार नाही. दरम्यान, वैभव नाईक यांच्या या आव्हानाला निलेश राणे काय उत्तर देतात हे पाहावं लागणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Viral Video | किंग कोब्राला Kiss करणाऱ्या ‘या’ माणसांचा व्हिडिओ झाला व्हायरल
- Gopichand Padalkar | “जयंत पाटील यांच्या घरावर भाजपचा झेंडा लागेल”; भाजप नेत्याच्या विधानाने राष्ट्रवादीत खळबळ
- Skoda Kushaq | Skoda Kushaq लवकरच दिसणार नव्या अवतारात
- Narayan Rane । “फोटोवर दुसरा कागद टाका आणि…”; ठाकरे गटाच्या ‘त्या’ टीकेला राणेंचं प्रत्युत्तर
- Travel Guide | ‘ही’ आहेत भारतातील सर्वोत्तम Hills Station