लोकसभेत पक्ष विरोधी काम करण जयकुमार गोरेंना भोवणार का ?

टीम महाराष्ट्र देशा : येत्या विधानसभा निवडणुकीत माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे हे भाजपमध्ये येऊ इच्छित आहेत. कारण गोरे आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची सध्याची जवळीकता पाहता गोरे बंडखोरपणा करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे आज माण-खटाव मतदारसंघाच्या सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी गोरे हटवण्यासाठी सातारा येथे आज बैठक बोलावली होती. त्यामुळे लोकसभेत पक्ष विरोधी काम करण जयकुमार गोरेंना भोवणार का ? असा सवाल सध्या राजकीय वर्तुळात विचारला जात आहे.

कॉंग्रेस आमदार जयकुमार गोरे यांनी लोकसभा निवडणुकीत पक्ष विरोधी भूमिका घेत भाजप खा. रणजीतसिंह निंबाळकर यांना पाठींबा दिला होता. तसेच निवडणुकी नंतरच्या काळात अनेक वेळा भाजप नेत्यांशी संपर्क देखील वाढवला.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील तसेच जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याशी जवळीक साधून तालुक्यातील विकासकामांचा सपाटा सुरू केला आहे. यामुळे माण, खटावमधील स्थानिक भाजपच्या नेत्यांमध्ये संघर्ष पेटला आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर जयकुमार गोरें विरोधात तालुक्यातील नेत्यांनी एकी करत गोरे हाताव अशी आघाडी केल्याने जयकुमार गोरे यांना आगामी विधानसभा निवडणूक जड जाणर असल्याचं दिसत आहे.

Loading...

दरम्यान सातारा येथे झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत भाजपचे माजी आमदार डॉ. दिलीप येळगांवकर, राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रभाकर घार्गे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई, शिवसेनेचे रणजितसिंह देशमुख, रासपचे जिल्हाध्यक्ष मामुशेठ वीरकर, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष सुभाष नरळे यांच्यासह तालुक्‍यामधील विविध पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी जयकुमार गोरे यांचा आगामी विधानसभा निवडणुकीत दुप्पट मतांनी पराभव करण्याचा जंग सर्वपक्षीय बैठकीत बांधण्यात आला आहे. गोरे यांचे माण-खटाव तालुक्याच्या विकासात योगदान नाही. निवडणुकीच्या तोंडावर ते केवळ चमकोगिरी करत आहेत, असा आरोप करण्यात आला आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अधिवेशन सुरु असतानाच मनसेला मोठा धक्का,'या' बड्या नेत्याने केला राष्ट्रवादीत प्रवेश
आमची 'आरती ' त्रास देत नाही ; तर तुमच्या ' नमाज ' चा त्रास कसा सहन करणार
राज ठाकरे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायला मैदानात उतरत असतील तर त्यांचे स्वागतचं...
जावयाला अडचण झाली तर मुलीलाही अडचण होणार हे लक्षात असुद्या - शिवेंद्रराजे भोसले
...अखेर प्राजक्त तनपुरेंचा राजीनामा
मंत्री अशोक चव्हाण यांचा खरा चेहरा उघड; रयत क्रांतीकडून टीका
मनसेच्या झेंड्यावरून वाद,मराठा क्रांती मोर्चा करणार खटला दाखल
बीड: भाजप-राष्ट्रवादीत राडा; सरपंचाला चोपले
रोहितदादा पवार मानले राव या माणसाला ! मुंबईच्या डबेवाल्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी झाला ' एक दिवसाचा मुंबईचा डबेवाला '
'देवेंद्र फडणवीस जगातील सर्वांत खोटारडे नेते'