fbpx

भाजपच्या महिला खासदाराने दिला भाजपच्याच आमदाराला चप्पलने चोप

mp rekha varma and mla trivedi conflict chappel

टीम महाराष्ट्र देशा: विकासकामांचा श्रेयवाद आपल्याकडे काही नवीन नाही. केलेल्या तर कधी न केलेल्याही कामच श्रेय कस घेता येईल यावर अनेक नेत्यांचा डोळा असतो. मात्र आता चक्क चादर वाटपाच्या श्रेयासाठी भाजप खासदार आणि आमदार भिडल्याच नाट्य पाहायला मिळाल आहे.

mp rekha varma and mla trivedi conflict

उत्तर प्रदेशमधील भाजपच्या खासदार रेखा वर्मा आणि भाजपचेच आमदार शशांक त्रिवेदी यांच्यात हा चादर वाद झाला आहे. सीतापूरमधील महोली तालुक्यात गरिबांना ब्लँकेटचं वाटप करण्यात येत होतं. मात्र या वाटपाच श्रेय घेण्यावरून खासदार वर्मा आणि आमदार त्रिवेदी यांच्यात शाब्दिक वाद निर्माण झाला. पुढे हा वाद एवढा वाढला कि रेखा वर्मा यांनी थेट आमदारावरच चप्पल उगारली त्यानंतर चप्पल ने हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे.

आता नेतेच भांडतायत म्हणल्यावर मागे राहतील ते कार्यकर्ते कसले. त्यांनीही एकमेकाला धक्काबुक्की करत टेबलही फेकले. दरम्यान पोलिसांनी मध्यस्थी करत सर्वाना शांत केल. मात्र आता हा व्हिडीओ समोर आल्यानंतर दोन्ही नेत्यांनी सारवासारव सुरु केली आहे.