केरळमध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची तोडफोड

mahatma gandhi brokan

कन्नूर: देशभरातील पुतळ्याची तोडफोड करण्याचे सत्र थांबता थांबेना. गुरुवारी केरळमध्ये अज्ञात व्यक्तींनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची तोडफोड केल्याचे समोर आले आहे. अज्ञातांनी गांधींजीच्या पुतळ्यावरील चष्मा तोडला असून या प्रकरणावर नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

त्रिपुरात लेलीनचा यांच्या पुतळ्याची तोडफोड केल्यानंतर देशभरात पुतळा तोडण्याचे सत्र सुरु आहे. बुधवारी कोलकात्यात जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुतळ्याची तोडफोड झाली. तर उत्तर प्रदेशमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली. मंगळवारी तामिळनाडूत द्रविड आंदोलनाचे जनक रामस्वामी पेरियार यांच्या पुतळ्याला लक्ष्य करण्यात आले होते.

पुतळ्यांच्या तोडफोडीचे प्रकार केरळमध्ये देखील उमटू लागले आहेत. कन्नूर येथील थलिपरंबा येथे महात्मा गांधींचा पुतळा आहे. या पुतळ्याला अज्ञात व्यक्तींनी लक्ष्य केले. पुतळ्यावरील चष्मा तोडण्यात आला. यानंतर हल्लेखोरांनी तिथून पळ काढला. या प्रकरणी पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. दरम्यान, विविध विचारधारेच्या नेत्यांचे पुतळे सामाजिक क्षोभापासून वाचवण्याचे आदेश केंद्राने राज्यांना बुधवारी दिले. भाजपच्या उन्मादी कार्यकर्त्यांनाही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी फटकारले होते. मात्र देशभरातील पुतळ्याची तोफड करण्याचे सत्र थांबताना दिसत नाही आहेत.