कॉंग्रेसच्या नाराज आमदारांना भाजपमध्ये घेऊन या; येडियुरप्पांचे कार्यकर्त्यांना आदेश

बंगळुरु : कर्नाटकमध्ये सत्ता स्थापनेत भाजपला अपयश आलं, मात्र भाजप अजूनही कर्नाटक मध्ये सत्ता स्थापन करण्याच्या सर्व मार्गाची चाचपणी करताना दिसत आहे. याचाच एक भाग म्हणून कॉंग्रेस आणि जेडीएसचं सर्व नाराज आमदारांना भाजपमध्ये घेऊन या असे आदेश कर्नाटकातील भाजप नेते बी.एस.येडियुरप्पा यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिले आहेत

Loading...

ते कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते. कर्नाटकच्या जनतेने भाजपाला कौल दिला होता. त्यामुळे आपण पुन्हा सत्तेमध्ये येऊ अशी लोकांना अपेक्षा आहे. पक्ष आणि २०१९ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंतप्रधानपदाची दावेदारी अधिक बळकट करण्यासाठी मी पक्षाच्या नेत्यांना विनंती करतो कि, त्यांनी काँग्रेस-जेडीएसमधील जे नाराज आमदार आहेत त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना भाजपामध्ये आणावे. ज्यांना कर्नाटक आणि देशाच्या विकासाची काळजी आहे त्याचे आम्ही स्वागत करु असेही यावेळी येडियुरप्पा म्हणाले.

दरम्यान भाजपा संयम दाखवेल. सरकार अस्थिर करण्याचा कोणताच प्रयत्न करणार नाही असेही त्यांनी सांगितले. अर्थसंकल्प सादर होईपर्यंत वाट पाहू त्यानंतर पुढचे पाऊल उचलू असे येडियुरप्पा म्हणाले. काँग्रेस-जेडीएस आघाडीमध्ये वाद वाढले असून याचा फायदा भाजपला होणार का ? हे पाहणे महत्वपूर्ण ठरणार आहे.

Karnataka Election : काँग्रेसचे ते दोन आमदार सापडले

 

2 Comments

Click here to post a commentLoading…


Loading…

Loading...