कानपूर येथे रेल्वेचे १२ डब्बे रुळावरून घसरले, अपघातात २० प्रवासी जखमी

टीम महाराष्ट्र देशा : कानपूर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास हावडा येथून नवी दिल्लीला जाणाऱ्या पूर्वा एक्स्प्रेसचे १२ डब्बे कानपुरजवळील रुमा गावाजवळ रुळांवरून घसरले आहेत. या अपघातात २० प्रवासी जखमी झाले असून त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे. घटनेची माहिती मिळताच कानपूरचे जीआरपी, आरपीएफ आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे.

‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री १२.३० च्या सुमारास ट्रेनचे कप्लिंग तुटल्यामुळे चालत्या ट्रेनचे १२ डब्बे रुळावरून घसरुन हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. धावत्या ट्रेनमध्ये अचानक हा हादसा झाल्याने प्रवाशांमध्ये मोठी खळबळ उडाली.

दुर्घटनेची माहिती मिळताच कानपूरचे जीआरपी, आरपीएफ आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे. तर जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले असून इतर प्रवाशांना विशेष ट्रेनने दिल्लीकडे रवाना करण्यात आले आहे. कपलिंग तुटल्यामुळे हा अपघात झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर या अपघातमुळे या मार्गावरच्या अन्य ११ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.Loading…
Loading...