अवघ्या बाहत्तर तासात झटपट हालचाल करून तिघांना अटक

crime

सातारा : कोरगाव येथील केदारेश्‍वर मंदीरासमोर युवकांच्या दोन गटात झालेल्या मारामारीत शंभु बर्गे या युवकाचा बळी गेला होता. याप्रकरणी अवघ्या बाहत्तर तासात झटपट हालचाल करून स्थानिक गुन्हे शाखेने तिघांना अटक केली.

याप्रकरणी अर्जुन राजेंद्र डेरे वय 19 रा. हनुमान घाट, बाजारपेठ कोरेगाव, आदीत्य उर्फ बाबु संजय शिंदे वय 19 रा. कोरेगांव, गणेश प्रकाश शिंगटे वय 23, रा . नवीन स्टँड रोड,कोरेगाव या तिघांना अटक करण्यात आली आहे. दि. 21 रोजी सांयकाली 7.30 वाजता हनुमान मंदिराजवळ कोरेगावातील एका गटाचे युवक आमच्या नातेवाईकास का मारले याचा जाब विचारण्यासाठी बनकर यास विचारण्यासाठी गेले होते. त्यावेळी अर्जुन डेरे बाबु शिंदे व इतर तिघे उपस्थित होते.

अर्जुन डेरे याने अक्षय बर्गे याच्या उजव्या पायाच्या नडगीवर लोखंडी गज मारला तर बनकर याने त्याच्याजवळील चाकु शंभु बर्गे याला मारला होता. मात्र शंभु याने तो चुकवला याच भांडणाच्या कारणावरून अज्ञात इसमांनी बर्गे याचा केल्याची फिर्याद मंदार आबासो बर्गे यांनी दिली होती. गुरूवारी दि . 24 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.पद्माकर घनवट यांना अर्जुन डेरे व इतर दोघे कोरेगाव परिसरातच असल्याची माहीती मिळाली होती.

त्यावरून पोलीस पथकाने या तिघांचा पाठलाग करुन त्यांना अटक केली. त्यांनतर सखोल चौकशीमध्ये त्यांनी बर्गे याचा खुन केल्याचे कबुल केले. या तपासात सहा.पो.नि विकास जाधव,उपनिरीक्षक प्रसन्न ज-हाड, सुरेंद्र पानसांडे, मोहन घोरपडे, तानाजी माने,रामा गुरव, विजय कांबळे, शरद बेबले, नितीन गोगावले, विक्रम पिसाळ, संजय जाधव, सचिन पवार यांनी भाग घेतला.