महापुरुषांचे पुतळे उभारण्याऐवजी भारतात शाळा, महाविद्याये उभारणे जास्त गरजेचे

raghuram rajan &pm

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रीय किंवा धार्मिक महापुरुषांचे मोठे मोठे पुतळे उभारण्याऐवजी भारताला जास्तीत जास्त शाळा, महाविद्यालये उभारणे गरजेचे आहे. असे मत भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी मांडले आहे. एका इंग्रजी नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी देशातील अर्थव्यवस्थेतील  मंदीवर देखील त्यांनी ताशेरे ओढले आहेत.

राजन यांनी नरेंद्र मोदी सरकारच्या सामाजिक-राजकीय अजेंड्यावर टीका केली. देशात पुतळे नव्हे तर शाळा, महाविद्यालये उभारावीत. राष्ट्रीय किंवा धार्मिक महापुरुषांचे मोठे मोठे पुतळे उभारण्याऐवजी भारताला जास्तीत जास्त शाळा, महाविद्यालये उभारणे गरजेचे आहे. ज्यामुळे येथील मुलांचा मानसिक विकास होईल. ते जास्त सहिष्णु आणि एकमेकांशी सन्मानाने वागायला शिकतील. यामुळे ही मुलं भविष्यातील स्पर्धात्मक जगात आपली जागा निर्माण करण्यात यशस्वी होतील.

Loading...

तसेच यावेळी राजन यांनी भारतीय अर्थव्यवस्थेवरदेखील सविस्तर भाष्य केले आहे. हिंदू राष्ट्रवाद फक्त सामाजिक तणाव वाढवत नाही, तर भारताच्या आर्थिक विकासाचा रस्ता सुद्धा बदलतो. हिंदू राष्ट्रवाद तणाव निर्माण करतोय, हिंदू राष्ट्रवाद सत्तेत जे असतात, त्यांच्याकडे जास्तीत जास्त नियंत्रण ठेवण्याची प्रवृत्ती असते. सध्याचे सरकार सुद्धा या प्रवृत्तीला अपवाद नाही. या सरकारचा सोशल आणि पॉलिटिकल अजेंडा असाच दिसून येत आहे, असे सांगत रघुराम राजन यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

त्याचप्रमाणे हिंदू राष्ट्रवाद फक्त सामाजिक तणाव निर्माण करत नाही, तर कोणत्याही प्रकारे भारताच्या हिताचा नाही. परंतु भारताच्या आर्थिक विकासावर याचा परिणाम होत आहे. ज्यामुळे सामजिक तणाव आणखीनच वाढतो, असेही रघुराम राजन यांनी म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

आणि... अजित दादांमुळे मुख्यमंत्र्यांवर ओढविणारी नामुष्की टळली
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
'भाजप-सेनेनं एकत्र यावं, मिळून सरकार स्थापन करु' ; NDAच्या बड्या नेत्याचं आवाहन
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
गृहमंत्री अमित शाह यांनी तातडीने राजीनामा द्यावा ,सुप्रिया सुळेंची मागणी
'बोकड बांधा लागते, मसाले आणा लागते, गावात तेव्हा लोक 'मतदान' करतात' : बच्चू कडू
फडणवीस साहेब कदाचित आपला गजनी झालायं - रुपाली चाकणकर
बालेकिल्ल्यात भाजपला धक्का; मेहतांनी कॉंग्रेस-राष्ट्रवादी-सेनेची माफी मागत भाजप सोडली
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
आता सुप्रिया ताईंना 'सेल्फी विथ खड्डे'चा विसर पडला आहे का?