भारतात 2,226 उर्वरित जगात केवळ 700 वाघ

In India 2,226 only 700 tigers in the rest of the world

नागपूर:  वन्यजीव प्रेमेंसाठी आनंदाची बातमी आहे.जगातील 12 देशांमध्ये केवळ 700 वाघ शिल्लक असताना भारतात मात्र, वाघांच्या संख्येत लक्षणीय वाढ नोंदवण्यात आली आहे. वाईल्ड लाईफ कंजर्वेशन ट्रस्टच्या सर्वेनुसार देशात वर्तमानात 2 हजार 226 वाघ आहेत. विशेष म्हणजे मध्य भारतातील ताडोबा, पेंच, कान्हा व मेळघाट आणि परिसरातील जंगलात 718 वाघ आहेत. सुमारे पाच महिने चाललेल्या हा सर्वे देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा सर्वे मानला जात आहे. यासंदर्भात माहिती देताना वाईल्ड लाईफ कंजर्वेशन ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. अनिश अंधेरिया यांनी सांगितले की, ट्रस्ट देश व अन्य 18 राज्यांतही वन्यजीव अभ्यासाची तयारी करण्यात येत आहे.

दोन हजार चौरस किमीमध्ये 6 हजार कॅमेरे-दोन हजार चौरस किलोमीटर परिसरात सर्व प्रकारचे वन्यजीवांची संख्या जाणून घेण्यासाठी सहा हजार कॅमेरे लावण्यात आले आहेत. म्हणजेच दीड किलोमीटर चौरस भागात दोन कॅमेरे लावले आहेत.वाघाची संख्या मोजताना त्यांच्या तीन वर्षाच्या आतील छाव्यांना सामील केलेजात नाही. चंद्रपुरमधील ताड़ोबा-अंधारी टायगर प्रोजेक्टमधील प्रमुख भागात 60 आणि बफर झोनमध्ये 15 वाघ आहेत. या दोन्ही क्षेत्रात 68 छावे कॅमे-यात आढळून आले आहेत. सुरक्षित ठिकाणाशिवाय अन्य ठिकाणीही 48 वाघ आणि 110 छावे असल्याचा दावा करण्यात आला आहे.

Loading...

दुसरीकडे, राष्ट्रीय वाघ संरक्षण प्राधिकरणाच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्रात 190 वाघ आहेत.वाघाची अफलातून भ्रमंतीचंद्रपुरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वाघ आता वर्ध्यातील बोर उद्यानापासून मेळघाटपर्यंत पोहचला आहे. याचे सबळ पुरावे मिळाले आहेत. नागझिरा येथील वाघ उमरेड आणि उरमेड वनपरिक्षेत्रातून ब्रम्हपुरी वनक्षेत्रात आल्याचे दिसून आले आहे.

Pic Credit Narenda-Gowda

चार लाख छायाचित्रांद्वारे त्रिस्तरीय गणना-दोन हजार चौरस किलोमीटर परिसरात केलेली ही गणना त्रिस्तरीय झाली. यात कॅमेरा ट्रॅपिंग, जेनेटिक तसेच फॉरेस्ट नेक्टिविटी अशी रचना करण्यात आली. गेल्या 19 डिसेंबर ते 21 एप्रिल या दरम्यान 156 दिवस चाललेल्या या प्रक्रियेत वन विभागाचे शेकडो कर्मचा-यांसह वाईल्ड लाईफ कंजर्वेशन ट्रस्टच्या सात सदस्यीय टीमचाही समावेश होता. कॅमेरा ट्रॅपिंगद्वारे 4 लाख छायाचित्रे घेण्यात आली.

जेनेटिक पद्धतीने तपासणी करताना वाघांच्या कळपातील शैचाची डीएनए टेस्ट करण्यात आल्या आहेत. फॉरेस्ट कनेक्टिविटीच्या माध्यमातून मध्य भारतात जगलांना जोडणा-या आणि वन्यजीव संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण मार्गाची माहिती झाली आहे.वाघांच्या संख्येत वाढ झाल्या बद्दल महाराष्ट्राचे मुख्य वन्यजीव संरक्षक ए.के. मिश्रा यांनी सांगितले कि वन विभागाने वन्यजीव व्यवस्थापन चांगल्या प्रकारे केल्यामुळे वाघाची संख्या महाराष्ट्रात वाढत आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

रोड कंत्राटदाराकडून कमिशन मागणाऱ्या महाराष्ट्रातल्या ७ खासदारांची आणि १२ आमदारांची होणार चौकशी
मोठाभाई ‌खूपच व्यस्त;अजिबात वेळ नाही जाणून घ्या काय आहे कारण
'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
रोहित पवार.... नाव तर ऐकलच असेल, पवारंनी लावला थेट मोदींना फोन
आमच्या दैवताबद्दल जो अपशब्द काढेल त्याची जीभ जागेवर राहणार नाही
भिडेंच्या सांगली 'बंद'ला राऊतांचे प्रत्युत्तर, म्हणाले...
सांगली बंदमागे राजकीय षडयंत्र आहे म्हणणाऱ्या सुळेंवर निलेश राणेंनी डागली तोफ
जेएनयू प्रकरणातील संशयित हल्लेखोरांची ओळख पटली,सत्य जाणून तुम्हालाही बसेल धक्का
महाराष्ट्राचा ढाण्या वाघ जाणार बेळगावात
राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर पोलिसांच्या ताब्यात