इंदापुरात तुकोबांच्या पालखीचं पहिलं रिंगण

 टीम महाराष्ट्र देशा : संत तुकाराम महाराज वारीतील पहिले गोल रिंगण पुणे जिल्ह्यातील बेलवडी (ता.इंदापूर) येथे झाले. लाखो वैष्णवांच्या साक्षीने आनंद सोहळ्याला सुरूवात झाली आणि टाळकरी, विनेकरी, पाखवाजी, झेंझेकरी यांच्या उत्साहाला पाराचं उरला नाही. इंदापूर तालुक्यातील सणसर येथील मुक्काम संपवून पालखी निमगाव केतकीकडे प्रयाण करणार आहे.

 

श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पुण्यस्पर्शाने आणि संजीवन समाधीच्या स्थानाने पवित्र झालेल्या आळंदीच्या तीर्थक्षेत्रापासून महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री विठ्ठलाच्या पंढरपूर या तीर्थक्षेत्री दरवर्षी लाखोंच्या संख्येने वारकरी मोठ्या श्रद्धेने पंढरीची पायी वारी करत असतात. आळंदी ते पंढरी ही पायी वारी करण्याची फार मोठी परंपरा आहे. शेकडो वर्षांचा धार्मिक, सामाजिक वारसा आहे. आजही तेवढ्याच उत्साहात माऊलींचा पालखी सोहळा निघतो अन् वारकरी, भाविक भक्तीरसात न्हाऊन निघतो.

पंढरीच्या वारीमध्ये वारकरी, फडकरी, दिंडीकरी, ग्रामस्थ, शेतकरी, कामकरी अशा गरीब, श्रीमंत व नोकरदार मोठ्या भक्तींभावाने सहभागी होत असतात. माऊलींबरोबरचा प्रवास ऊन, वारा, पाऊस, पाणी सोयी-गैरसोयी यांचा विचार न करता टाळ मृदुंगाच्या साथीने भगवी पताका खांद्यावर घेऊन मुखाने अभंग गात भक्ती रसात रंगून जातात. पालखी किंवा वारी हा जसा एक अध्यात्मिक अविष्कार आहे तसाच तो एकात्मकतेचा विराट लोकप्रवाह आहे.

शिवाजी महाराजांचे अजून एक पत्र प्रकाशात

पालखीच्या स्वागतासाठी पुण्यनगरी सज्ज