भाजपकडून गुरुदासपूर मधून लढणार ‘सनी’ ?

टीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय पक्षांनी प्रसिद्ध सिने अभिनेत्यांचा वापर या लोकसभा निवडणुकीत करून घेण्याचे ठरवले आहे. तसेच सिने अभिनेत्यांनी राजकारणात येवून स्वतःचे स्थान निर्माण करणे हे काही नवीन नाही. यंदा पंजाबच्या गुरुदासपूर मतदारसंघातून भाजप सनी देओलला उमेदवारी देण्यास उत्सुक असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

आपल्या भारदस्त आवाजाने आणि जबराट अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ पडणारे सनी देओल राजकारणात सक्रीय होण्यास मात्र काही तयार नाहीत. त्यामुळे सनीला उमेदवारीसाठी तयार करण्यासाठी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांवर केंद्रीय नेतृत्वाने जबाबदारी सोपवली आहे. सनी देओलचे पिता आणि ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना भाजप नेते गळ घालणार आहेत.

गुरुदासपूर हा मतदार संघ विनोद खन्ना यांचा होता. विनोद खन्ना हे भाजपच्या तिकिटावर ४ वेळा निवडून आले होते मात्र २०१७ मध्ये विनोद खन्ना यांच्या निधनानंतर ही जागा कॉंग्रेस च्या ताब्यात गेली मात्र आता या निवडणुकीत ही जागा पुन्हा भाजपला आपल्या ताब्यात घेयची आहे. त्यासाठी भाजप पक्ष सनी देओल यंच्या उमेदवारी साठी आग्रही आहेत .