राष्ट्रवादीचा गुजरातेत स्वबळाचा नारा, पुरोगामी मतांची आता विभागणी होत नाही का ?

टीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस ने पुरोगामी विचारांचा मुद्दा पुढे करत आघाडी केली आहे. मात्र महाराष्ट्र व्यतिरिक्त इतर राज्यांमध्ये कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी विभक्त लढणार आहेत. त्यामुळे पुरोगामी विचारांचा मुद्दा हा फक्त राज्यापुरताच मर्यादित आहे का असा प्रश्न निर्माण होत आहे.

गुजरातमध्ये युती आणि आघाडी मध्ये डाळ न शिजल्याने शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष हा स्वतंत्र निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे गुजरात मध्ये कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष एकमेकांविरोधात लढणार आहेत. राज्यात पुरोगामी विचारांचा नारा देवून सत्ताधारी भाजप आणि युती विरोधात एकत्र आलेले कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस इतर राज्यांमध्ये हा धर्म पाळताना दिसत नाहीत. त्यामुळे या राजकीय पक्षांची राज्यनिहाय बदलणारी भूमिका सामन्य नागरिकांना पेचात टाकणारी आहे.

Loading...

दरम्यान राष्ट्रवादी प्रमाणे शिवसेनेची देखील दुतोंडी भूमिका या निवडणुकीच्या निमित्ताने समोर आली आहे. बंगालमध्ये सेनेनं स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. महराष्ट्रात हिंदुत्ववादी मुद्यावरून भाजप आणि सेनेमध्ये युती झाली आहे. मात्र तो मुद्दा बंगालमध्ये लक्षात का घेण्यात आला नाही. असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. तसेच सेना भाजप महाराष्ट्रात वेगळे लढले तर हिंदुत्ववादी मतांची विभागणी होईल अशी भीती सेनेने व्यक्त केली होती. मग आता भाजप विरोधात बंगाल मध्ये लढताना हिंदुत्वादी मतांची विभागणी होणार नाही का असा सवाल सोशल मिडीयावर उपस्थित होऊ लागला आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

मी शरद पवारांसोबत जाणारचं... रामदास आठवले म्हणतात
कीर्तने पोलीस बंदोबस्तात करावी लागतात हीच तर माझी दहशत - तृप्ती देसाई
आता इंदोरीकर महाराजांच्या कार्यक्रमाला युवासेनेच्या वाघांचे संरक्षण....
अमिताभ बच्चन यांच्यासोबत इंग्रजीत बोलाव लागल असतं तर..., नागराज मंजुळेंनी सांगितला अनुभव
तुकाराम मुंढे यांच्या 'या' निर्णयामुळे नागपूर पालिकेचे वर्षाला वाचणार सुमारे 10 ते 11 कोटी
व्याह्याला वाचवण्यासाठी संजय काकडेंची धडपड
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
'तात्याराव, याच्या नावातून आडनाव काढून टाकायची वेळ आणली कारट्यानं'
हे सरकार पडले तर 'आम्हाला' दोष देऊ नका...
राष्ट्रवादीच्या 'या' बड्या नेत्याने दिला राजीनामा