मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आजच्या रोखठोक सदरातून गोव्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीवर भाष्य केलं आहे. यात त्यांनी गोव्याचे माजी मुख्यमंत्री तथा दिवंगत भाजप नेते मनोहर पर्रीकर, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व राष्ट्रीय महामार्ग विकासमंत्री नितीन गडकरी यांच्यासह तृणमूल काँग्रेस व आम आदमी पक्षावर निशाणा साधला आहे.
संजय राऊत लिहीतात, काँग्रेसच्या निवडणुकीनंतर १७ आमदार होते. ते आता २ राहिले बाकी सगळेत गेले, कारण गोव्यात काँग्रेसचे सक्षम नेतृत्व नाही. राष्ट्रीय भूमिका घेऊन गोव्यात निवडणुका लढवल्या जात नाही. दिल्लीच्या राजकारणाशी गोव्याचे नाते कधीच नव्हते. मनोहर पर्रीकर संरक्षणमंत्री म्हणून गेले, पण मनाने गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर घुटमळत राहिले. त्यामुळे तृणमूल आपसारवरून येऊन गोव्याला धडे देत आहेत. ‘आप’चे लोक आता गोव्यात स्थान ८० टक्के नोकऱ्या राखीव ठेवण्याचा प्रचार करीत आहेत. गोव्याच्या निवडणुकीत आता भूमिपुत्रांना प्राधान्य देण्यावर धुमशान सुरू आहे. पण गोव्यात आज एकही राजकीय पक्ष मुळच्या भूमिपुत्रांचा राहिलेला नाही. मुख्यमंत्री सावतांनी आता सांगितले, पुढील पाच वर्षात गोव्यात ३० हजार नौकऱ्या उपलब्ध करून देऊ. ही सरळ थापेबाजी आहे.
गोव्यात गेली १० वर्षे भाजपचे राज्य आहे व बेरोजगारी प्रचंड वाढली आहे. पैसे खाऊन सरकारी नोकऱ्या विकणारे त्यांच्याच सरकारात बसले आहेत. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने स्वतःचे स्वत्व आणि अस्तित्व संपविले आहे. ढवळीवर कुटुंबापुरताच तो पक्ष आता उरला आहे. गोव्याच्या भूमिपुत्रांच्या रोजगाराच्या प्रश्नावर कोणी आवाज उठवत नाही. कारण गोव्यात बाहेरुन आलेले सर्व उद्योगपती, त्यात कॅसिनो, जुगारी बोटींचे मालक जास्त, हेच लोक गोव्याचे राजकीय अर्थकारण चालवीत आहेत.
गोव्यात मायनिंगवर बंदी, त्यामुळे लाखो लोकांनी रोजगार गमावला. गोव्यातील काँग्रेस, भाजप पक्षाचे लोक यावर बोलत नाहीत. गोव्यातले सगळेच आमदार व पुढारी आज मालामाल आहेत. पक्षांतरे करून त्यांनी माया जमवली. मते विकत घेऊन निवडणुकीत गुंतवलेले भांडवल मिळेल त्या मार्गाने वसूल करणे हे गोव्यासारख्या राज्यातला शिष्टाचार बनला आहे. काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेले १० आमदार घाऊक पद्धतीने भाजपमध्ये गेले. आता त्यांचे महत्त्व संपले भाजपमध्ये उमेदवाचा मिळणार नाहीत हे लक्षात येता त्यातले बरेचसे आमदार तिकिटासाठी पुन्हा काँग्रेसच्या दारात उभे राहिले “जे काँग्रेस सोडून गेले अशा बेइमान लोकांना पुन्हा उमेदवारी देणे नाही, हा काँग्रेसचा धोरणात्मक निर्णय आहे, असे काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर मला म्हणाले हे दिलासादायक आहे. ज्यांनी पक्ष केली त्यांचा पराभव झाल्याशिवाय गोव्याची राजकीय हवा स्वच्छ होणार नाही. अशी टीका रोकठोकमधून संजय राऊतांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘जिवाची काळजी असेल तर…’ पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी साधला मोदींवर निशाणा
- “गोव्यातील निवडणुकीत पैशांचा पाऊस!”, राऊतांचा रोखठोकमधून गडकरींवर निशाणा
- पुढील चार दिवस महराठवाडा, विदर्भात गारपीटीसह पावसाचा इशारा
- वडिलांच्या निधनानंतर विशाल ददलानी भावूक, म्हणाला “त्यांना शेवटचे…”
- मराठा आरक्षणप्रश्नी सुप्रीम कोर्टात विनोद पाटील मांडणार ‘हा’ महत्वाचा मुद्दा
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<