आता भविष्यात कोणाला ‘भाऊ’ मानणार नाही; पंकजा मुंडेनी व्यक्त केल्या भावना

उस्मानाबाद : भाजप नेत्या आणि ग्रामविकासमंत्री मंत्री पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षावर टीकास्त्र सोडले. “आता भविष्यात कोणाला भाऊ मानणार नाही, रमेश कराड यांनी भाजपा सोडल्यामुळे आपल्याला धक्का बसला अशा भ्रमात जे आहेत, त्यांनाच धस यांच्या उमेदवारीमुळे धक्का बसला आहे” असे त्यांनी स्पष्ट केले.

स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीत भाजपातर्फे सुरेश धस यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी सुरेश धस, आमदार सुजितसिंह ठाकूर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य नितीन काळे, जिल्हाध्यक्ष नितीन काळे उपस्थित होते.

काय म्हणाल्या पंकजा मुंडे ?

“रमेश कराड यांनी भाजपा सोडल्यामुळे आपल्याला धक्का बसला अशा भ्रमात जे आहेत, त्यांनाच धस यांच्या उमेदवारीमुळे धक्का बसला आहे. गोपीनाथ मुंडे यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांस आव्हान देणारे धस यांच्यासारख्या तगड्या उमेदवाराला डावलल्यामुळे राष्ट्रवादीला त्याचा फटका सोसावा लागणार आहे. कराड यांनी पक्ष सोडला आहे, आपल्याला सोडलेलं नाही. भविष्यात आता कोणाला भाऊ मानणार नाही”