उदगीर तहसील समोर गावकऱ्यांच अमरणउपोषण सुरू

स्वतंत्र्याची ६९ वर्ष पूर्ण उदगीर जवळील आढोळतांडा येथे रस्ताच नाही

उदगीर/ प्रतिनिधी : उदगीर पासुन तीन ते चार किलोमीटर अंतरावर असणाऱ्या आढोळतांडा या गावाला रस्ताच नसल्याने समस्त गावकऱ्यांनी मंगळवार (दि १४) रोजी पासुन उदगीर तहसील समोर अमरण उपोषण करत आहेत. स्वतंत्र्याची ६९ वर्ष पूर्ण झाली तरी आढोळतांडा गाव मात्र विकासापासून वंचित आहे. सार्वजनिक बांधकाम विभागा या विषयी का? अनभिज्ञ आहे. असा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे.

उदगीर – सोमनाथपुर- आढोळातांडा असा रास्ता होणे गरजेचं आहे. आढोळातांडा हे गाव सोमनापुर ग्रामपंचायत अंतर्गत येत असल्याने, सोमनापुर ग्रामपंच्यात मध्ये या रस्त्याचा ठराव मंजुर करण्यात आला असल्याचं आंदोलन कर्त्यांचं म्हणणं आहे. मात्र आता पर्यंत या गावी पुर्ण रास्ता नसल्याने, गावकऱ्यांना मोठी पायपीठ करावी लागत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अर्धवट रास्ता झाला मात्र त्यानंतर रास्ता गावापर्यंत पुर्ण नझाल्याने सर्वसामान्य नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं गावकऱ्यांच म्हणणं आहे.

विशेष म्हणजे गावात वृद्ध नागरिक, गरोदर महिला, आजारी नागरिकांना हॉस्पिटल ला जाण्यासाठी मोठी अडचण आहे. तर आढोळतांडा येथे इयत्ता चौथी पर्यंत शाळा आहे. पण पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना वाहतूक सुविधा नसल्याने मुलींचं शिक्षण रुकलेलं आहे, मात्र मुले कसतरी धोपट मार्गांनी उदगीर येथे शिक्षणासाठी येत असतात.आशा अनेक व्यथा गावकरी पुण्यनगरी प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. त्यामुळे दळणवळणा च्या सुविधा नसल्याने स्वतंत्र्याची ६९ वर्ष पूर्ण होऊन देखील आढोळातांडा विकासापासून वंचित असल्याने आता तरी सार्वजनिक बांधकाम विभागास जाग येणं अपेक्षित असल्याचं गावकरी म्हणत आहेत. त्यामुळे सर्व गावकरी उदगीर ते आढोळातांडा हा रस्ता पुर्ण करवा या मागणी साठी उदगीर तहसील समोर आमरण उपोषण करत आहेत या मागणीचे निवेदउपविभागीयअधिकारी यांना दिले आहे.

यावेळी राजकुमार आडे ग्रा. प. सदस्य, देवजी चव्हाण, लक्ष्मण राठोड, गुरुनाथ राठोड, भीमराव पवार, शेषेराव पवार, रमेश पवार, बालाजी राठोड, प्रल्हाद चव्हाण, सखाराम चव्हाण, प्रकाश चव्हाण, तानाजी आडे, गुरुनाथ आडे गावातील आदीं नागरिकांच्या स्वाक्षऱ्या निवेदनावर नमूद आहेत.

फेसबुकवरून बदनामी, सुप्रिया सुळेंनी केली पोलिसात तक्रार

रस्ते असे बनवणार की त्यावर किमान १० वर्ष खड्डे पडणार नाहीत – चंद्रकांत पाटील

 

You might also like
Comments
Loading...