fbpx

अभाविपद्वारे स्थापत्य अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांच्या समस्यांविरोधात धडक मोर्चा

पुणे – अभाविपने आज पदवीधर स्थापत्य अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांच्या भरतीमध्ये जागा वाढवण्यात याव्या. तसेच बांधकाम, जलसंपदा आणि जलसंधारण भरतीमध्ये पदवीधारकांवर झालेल्या अन्यायाबाबत शनिवारवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालय ह्या मार्गावर स्थापत्य अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांच्या समस्यांना घेऊन धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

पदवीधर स्थापत्य अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांच्या भरतीमध्ये पदविका आणि १२ वी नंतर अभियांत्रिकीची पदवी घेणारा प्रत्येक विद्यार्थी शासनाकडून निघणाऱ्या भरतीमध्ये अपेक्षित असावा, सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळावी ह्या प्रमुख मागणीसाठी आज अभाविपद्वारे धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी अभाविप पुणे महानगरमंत्री अनिल ठोंबरे म्हणाले, महाराष्ट्र शासनाकडुन युवा वर्गाला रोजगार देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. पण त्यात सरकार सपशेल अपयशी पडल्याने त्याचाच रोष म्हणून आज विद्यार्थी मोठ्या संख्येने अभाविपद्वारे आयोजित धडक मोर्चात सहभागी झालेले होते. सरकारने विद्यार्थ्यांना वेठीस धरू नये व अधिकाधिक विद्यार्थ्यांसाठी भरतीमध्ये जागा वाढवण्यात याव्या.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन अभाविपने आपल्या मागण्या शासनासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. या मोर्चामध्ये अभाविप पुणे महानगर मंत्री अनिल ठोंबरे, महानगर सहमंत्री योगेश्वर राजपुरोहित व अन्य विद्यार्थी उपस्थित होते.