भाजपच्या विकास कामांच्या यादीसमोर फडणवीसांचा दुष्काळ प्रस्ताव मागे पडला

सोलापूर – ( सूर्यकांत आसबे ) – विविध विकासकामांच्या निमित्ताने बुधवारी सोलापुरात आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेतील भाषणाकडे मोठ्या आशेने डोळे आणि कान लावून बसलेल्या तमाम शेतकऱ्यांची निराशा झाली. पंतप्रधान मोदी हे दुष्काळ आणि शेतकरी कर्जमाफीवर बोलतील अशी त्यांची आशा अक्षरशः फोल ठरली. भाजप सरकारने केलेल्या देशभरातील विकासकामांची भलीमोठी यादी वाचून दाखवत पंतप्रधान मोदी यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शब्दही न काढल्याने सभेसाठी आलेल्या शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला.

महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला आहे. सोलापूर जिल्हासुद्धा यामध्ये होरपळून जात आहे . सोलापूर जिल्ह्यात तर केवळ ३८ टक्के पाऊस पडला असल्याने शेतकरी अडचणीत आल्याचे सांगितले. हा दुष्काळ पाहण्यासाठी आपण सांगितल्याप्रमाणे अधिकाऱ्यांचा दौरासुद्धा झाला आहे. केंद्राकडे तसा दुष्काळाचा अहवालही देण्यात आला आहे. दरम्यान,आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापूरला येणार म्हटल्यानंतर सोलापूरसह आजूबाजूच्या जिल्ह्यातून शेतकरी मोठ्या आशेने आलेले होते.

या दुष्काळासाठी दिलेल्या प्रस्तावाबाबत विचार व्हावा अशी मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांच्या भाषणाला सुरुवात झाली. भाषण सुरु होऊन संपत आले तरीसुद्धा मोदी यांनी शेतकरी कर्जमाफी आणि दुष्काळाबद्धल कोणतीच वाच्यता केली नाही. त्यामुळे मोदी शेतीविषयी आणि दुष्काळाबाबत काहीतरी घोषणा करतील या आशेने आलेल्या शेतकऱ्यांची मात्र घोर निराशा झाली.

You might also like
Comments
Loading...