Ramdas Kadam- शिवसेनेचे बँकांसमोर ढोल वाजवा आंदोलन

कर्ज मुक्तीचा लाभ मिळालेल्या ८९ लाख शेतकऱ्यांची यादी बॅंकांकडून येत्या आठ दिवसात देण्यात यावी, अशी मागणी करत शिवसेनेनं काल राज्यभर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांसमोर ढोल वाजवा आंदोलन केलं. पक्षाचे नेते, पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी काल मुंबईत पत्रकार परिषद घेऊन, या आंदोलनामागची भूमिका स्पष्ट केली. कर्ज वसुलीसाठी बँक शेतकऱ्यांच्या घरासमोर ढोल वाजवून दबाव आणत असे, त्याच धर्तीवर राज्यभरात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांसमोर ढोल वाजवा आंदोलन केल्याचं, कदम यांनी सांगितलं. चिनी बनावटीच्या वस्तू, पाकिस्तानसोबत क्रिकेट या दोन्ही बाबींना विरोध करत, कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या भूमिकेवरही टीका केली.
मराठवाड्यातही औरंगाबाद सह जालना, बीड, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली आणि उस्मानाबाद, इथं जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसमोर तसंच सर्व तालुक्यांमध्ये बँकेच्या शाखांसमोर ढोल वाजवून आंदोलन करण्यात आलं. या योजनेत लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं मोठ नुकसान झाल्याचा आरोप करुन शिवसनेनं कर्जमाफी होणाऱ्या शेतकऱ्यांना तातडीनं १० हजार रुपये कर्ज वाटप करावं, यासह विविध मागण्या केल्या. उस्मानाबाद इथं आंदोलनानंतर आपल्या मागण्यांचं निवेदन पक्षाच्या वतीनं जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सादर करण्यात आलं.
You might also like
Comments
Loading...